Saturday, April 27, 2024
Homeनाशिकपत्नीकडून पतीचा निर्घृण खून

पत्नीकडून पतीचा निर्घृण खून

नाशिक | प्रतिनिधी

घरगुती भांडणाच्या (Domestic quarrel) कारणावरून राग आल्याने पत्नीने (wife) पतीचीच (Husband) हत्या (Murder) केल्याची घटना वाडाळागावात (Wadalagaon) घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिलीप रंगनाथ कदम (Dilip Ranganath Kadam) (४९) हे त्यांची पत्नी नंदाबाई दिलीप कदम (३६) हिच्यासोबत माळी गल्ली वडाळागाव,नाशिक येथे राहत होते. दोघा पती-पत्नीमध्ये घरगुती भांडणाच्या कारणावरून वाद झाले.

याचा नंदाबाई हिला पती दिलीप यांचा राग आल्याने (दि. २२ ते दि.२४) तिने त्यांचे हातपाय बांधून टॉवेलने गळा आवळून धारदार शस्त्राने (sharp weapon) भोसकून जखमी केले. या मारहाणीत दिलीप यांचा मृत्यू (Death) झाला.

दरम्यान, त्यांचे प्रेत पलंगाखाली लपवून नंदाबाई घराला कुलूप लावून पळून गेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी निखिल बोंडे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या