Thursday, April 25, 2024
Homeनगरपैशासाठी पत्नीचा छळ, गुन्हा दाखल

पैशासाठी पत्नीचा छळ, गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गाडी घेण्यासाठी 3 लाख रूपये आणि जागा घेण्यासाठी 13 लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेस शिवीगाळ, मारहाण करून छळ करण्यात आला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

संदीप शिवाजी जगताप (वय 37, रा. तपोवन रोड, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पीडित विवाहिता ही शिक्षिका आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 18 डिसेंबर 2013 पासून आतापर्यंत पती संदीप जगताप याने पीडित विवाहिता ही सासरी नांदत असतांना गाडी घेण्यासाठी 3 लाख रूपये आणि जागा घेण्यासाठी 13 लाख रूपयांची मागणी करून मारहाण व शिवीगाळ केली. तसेच चारित्र्याचा संशय घेऊन मानासिक, शारिरिक व आर्थिक छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या