Thursday, April 25, 2024
Homeनगरमित्राच्या मदतीने पतीकडून पत्नीला मारहाण

मित्राच्या मदतीने पतीकडून पत्नीला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोर्टात सुरू असलेल्या वादातून मित्राच्या मदतीने पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. मंगळवारी दुपारी साडे चार वाजता मार्केटयार्ड चौकाजवळ ही घटना घडली.

- Advertisement -

तबस्सुम जिब्राहिम शेख (वय 27 रा. काळा माथा, वारूळवाडी रोड, गजराजनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे पती जिब्राहिन रफिक शेख (रा. भवानीनगर, मार्केटयार्डच्या पाठीमागे) व त्याचा मित्र मुक्तार (पूर्ण नाव माहिती नाही, रा. कोठला) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तबस्सुम जिब्राहिम शेख व त्यांचे पती जिब्राहिन रफिक शेख यांच्यात कोर्टात वाद सुरू आहे.

या वादाची तारीख असल्याने फिर्यादी मंगळवारी कोर्टात गेल्या होत्या तेथे त्यांचे पतीसोबत वाद झाले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. दरम्यान मंगळवारी दुपारी फिर्यादी बाजारपेठेत खरेदीसाठी गेल्या असता त्यांना पती जिब्राहिनने लाकडी दांडक्याने मारहाण केली तर मुक्तारने लाथाबुक्क्याने मारहाण केली. मारहाणीत फिर्यादी जखमी झाल्या आहेत. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या