Thursday, April 25, 2024
HomeनाशिकNashik : पतीच्या दशक्रियेला गेल्याने विधवा पत्नीच्या तोंडाला फासलं काळं; काय आहे...

Nashik : पतीच्या दशक्रियेला गेल्याने विधवा पत्नीच्या तोंडाला फासलं काळं; काय आहे प्रकरण?

नाशिक | Nashik

राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या (Violence Against Women) घटना वाढत असल्याचे पाहायला मिळत आहेत. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) चांदवड तालुक्यातील (Chandwad taluka) शिवरे या गावात घडली आहे…

- Advertisement -

…तर मोदी-अमित शहांना तुरुंगात टाकू – प्रकाश आंबेडकर

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवरे (Shivre) या गावी एका कुटुंबातील विवाहितेचा किरकोळ अपघात होऊन हात फ्रॅक्चर झाला होता. त्यावेळी तिच्या हाताला प्लास्टर केले असल्याने देखभालीसाठी पतीने तिला माहेरी आणून घातले. त्यानंतर पती आपल्या दोन मुलींसह एक-दोनदा भेटायलाही गेला. पंरतु,पत्नी माहेरी असतानाच पतीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. यानंतर पत्नीला पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली.

…अन् संशयातून चिमुकल्यांच्या डोळ्यांसमोरच त्याने संपवलं पत्नीला

त्यानंतर पतीच्या (Husband) दशक्रियाविधीला आलेल्या पत्नीने माझे पती आत्महत्या (Suicide) करणार नाहीत त्यांचा घातपात झाला असेल,असा संशय व्यक्त केला. त्यावेळी पतीच्या बहिणीने तिला मारहाण (Beating) करण्यास सुरूवात केली. यावेळी गावातील महिलाही पुढे सरसावल्या व त्यांनी देखील महिलेसोबत मुलांना मारहाण केली.

यानंतर इतर महिलांनी त्या महिलेची सुटका केली. तसेच त्या विधवा महिलेचे तोंड काळे करून तिला चपलांचा हार घालत गावभर धिंड काढली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनिल परबांचे किरीट सोमय्यांना आव्हान; म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या