Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशWHO ची टीम 'वुहान'मध्ये दाखल; करोना उत्पत्तीचा घेणार शोध

WHO ची टीम ‘वुहान’मध्ये दाखल; करोना उत्पत्तीचा घेणार शोध

दिल्ली | Delhi

करोना या विषाणू केवळ एका देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. या विषाणूचा प्रसार वुहानमधून झाल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. करोना व्हायरस कुठून आला? त्याचे मूळ काय? या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञांचे पथक अखेर वुहानमध्ये दाखल झाले आहे.

- Advertisement -

चीनमधील वुहानमधून करोना व्हायरस जगभरामध्ये पसरला. मात्र या व्हायरसची उत्पत्ती नेमकी कशी झाली, हे शोधण्याचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटना करणार आहे. करोनाच्या उत्पत्तीबाबत शोध घेण्यासाठी WHO तज्ञांची १० जणांची टीम वुहानमध्ये दाखल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कामाला सुरुवात करण्याआधी टीमला दोन आठवडे क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. करोना व्हायरसचा पहिला रुग्ण चीन देशातील वुहान शहरामध्ये आढळला होता. त्यानंतर जगाला करोनाचा विळखा बसला.

WHO मधील तज्ज्ञांचा दौरा नेमका कसा असणार आहे, याबाबत अद्याप कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने यासंदर्भात कोणतीच माहिती दिलेली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून या दौरा होणार की, नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. WHO चे प्रमुख टेड्रोस अधानम घेब्रेयेसस यांनी गेल्या आठवड्यात चीनकडून दौऱ्याची रुपरेषा देण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागत असल्याचं सांगत निराशा व्यक्त केली होती. चीनने सोमवारी WHO च्या अधिकाऱ्यांच्या दौऱ्याची घोषणा केली.

दरम्यान, चीनमध्ये करोनाने पुन्हा एकदा डोक वर काढले असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. यामुळे लॉकडाऊन वाढवला आहे. तसेच बिजिंगमधील सर्व राजकीय परिषद रद्द केले आहेत. गुआन शहरातील नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सात दिवसांसाठी प्रशासनाकडून हे आदेश जारी केले असून वुहान प्रांतातही अनेक कडक निर्बंध लादले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या