Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकोव्हॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता

कोव्हॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

भारताच्या करोनावरील कोव्हॅक्सिन लसीला Covaxin Vaccine जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) WHO मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारची संस्था आयसीएमआर ICMR आणि भारत बायोटेक Bhart Biotechयांनी संयुक्त विद्यमाने कोव्हॅक्सिन ही लस विकसित केली आहे.

- Advertisement -

कोवॅक्सिनच्या मंजुरीसाठी भारत बायोटेक कंपनीचे प्रयत्न सुरू होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल अ‍ॅडवायजरी ग्रुपने कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. कोवॅक्सिन ही भारताची स्वदेशी लस आहे.

भारत सरकार आणि भारत बायोटेकने मिळून ती विकसित केली आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेत कोवॅक्सिनसह कोविशिल्ड या लसींचा सर्वाधिक उपयोग होत आहे. तसेच या दोन्ही लसींना सर्वप्रथम केंद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कोवॅक्सिनला मंजुरी मिळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने शिक्कामोर्तब करण्याची आवश्यकता होती.

आता जागतिक आरोग्य संघटनेनेही कोवॅक्सिन लसीला मंजुरी दिल्याने हे भारताचे मोठे यश मानले जात आहे. कोवॅक्सिन करोनाविरोधात 78 टक्के प्रभावी असल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. तसेच दुसर्‍या डोसनंतर 14 दिवसांनंतर कोवॅक्सिन प्रभावी ठरते. त्याशिवाय, या लसीचे डोस साठवून ठेवण्याची प्रक्रिया सुलभ असल्यामुळे गरीब आणि विकसनशील देशांसाठी ही लस अतिशय उपमुक्त असल्याचे डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले आहे.

कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी न मिळाल्याने विदेश दौर्‍याला जाणार्‍या भारतीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कोवॅक्सिन लस घेतलेल्या भारतीयांना अनेक देशांमध्ये क्वारंटाईन केले जात होते किंवा प्रवेशास परवानगी नाकारण्यात येत होती. पण आता कोवॅक्सिन लस घेतलेल्या भारतीय नागरिकांच्या विदेश दौर्‍यातील मोठी अडचण दूर झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या