Tuesday, April 23, 2024
Homeजळगावयावल तालुक्यात पांढऱ्या सोन्याच्या चोऱ्या वाढल्या

यावल तालुक्यात पांढऱ्या सोन्याच्या चोऱ्या वाढल्या

यावल Yaval प्रतिनिधी

तालुक्यातील (Yaval taluka) बोरावल बुद्रुक अंजाळा दहिगाव कोरफवली मनवेल थोरगव्हाण मोराळा शिवारात (Shivarat) पांढऱ्या सोन्याच्या (White gold) म्हणजेच कापसाच्या (cotton) चोऱ्या वाढल्या (Thefts increased) असून चोरट्यांचा बंदोबस्त (Settlement of thieves) करण्यासाठी शेतकरी (farmer) वर्ग हैराण झालेले आहे.

- Advertisement -

Photos # …तर यावलमध्ये हिवाळ्यात जाणवणार कृत्रीम पाणीटंचाई

बोरावल बुद्रुक येथील दीनानाथ ताराचंद चौधरी यांचे शेतात मजूर वर्ग कापूस वेचत असताना बांधावरून 40 किलो कापूस बोथ्यामध्ये भरलेला अज्ञात चोरांनी चोरून नेला याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे तर शेतांमधून रात्रीच्या वेळी कापसाच्या चोऱ्या तालुक्यात वाढल्या असून शेतकऱ्यांनी दिवसभर शेतात मजूर न मिळत असल्यामुळे कापूस वेचून व काम करून थकून मागून घरी जातो तर रात्रीच्या वेळी चोरटे मात्र पांढऱ्या सोन्याची चोरी करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

रात्री अपरात्री चोरी होत असल्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला असून पीक संरक्षण संस्था व शेतकऱ्यांनी स्वतः आपला रखवाली करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. पोलीस स्टेशनला अर्ज देऊनही व गुन्हा दाखल केल्यावरही अशा चोरट्यांचा बंदोबस्त ते सुद्धा करू शकत नाहीत. स्टॉप कमी असल्यामुळे रात्री अपरात्री पोलीस शहराची व खेड्याचा बंदोबस्त करतील का शेताची करतील असाही प्रश्न उपस्थित होत असून चोरट्यांचा स्थानिक स्तरावरच शेतकऱ्यांनी एकजुटीने बंदोबस्त करायला हवा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या