Friday, May 10, 2024
Homeजळगावयुक्रेन असो वा असो रशिया पावलोपावली आमचा मृत्यूशी सामना

युक्रेन असो वा असो रशिया पावलोपावली आमचा मृत्यूशी सामना

शरद बोदडे

मुक्ताईनगर Muktainagar

- Advertisement -

युक्रेन (Ukraine) असो वा असो रशिया (Russia) पावलोपावली आमचा मृत्यूशी सामना (faces our death) असा अनुभव युक्रेन व रशियात शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना (Indian students) येत आहे. पावलोपावली मरणाची भीती असलेल्या रशिया देशातून अतिशय खडतर प्रवास करीत , मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी (Sukli) येथील वैद्यकीय शिक्षण घेणारा युवक (Young man) नुकताच घरी सुखरूप परतला.

मुक्ताईनगर जे ई स्कूल येथील उपशिक्षक तसेच तालुक्यातील सुकळी (Sukli) येथील समाधान गायकवाड यांचा मुलगा अनिकेत (Aniket) एम.बी.बी.एस. शिक्षणासाठी रशिया (Russia) येथील सिम्फोरोपोल या शहरात क्रिमीया विद्यापीठात (University of Crimea) होता. युध्दसीमा जवळच असल्याने तेथील नागरीक व विद्यार्थी यांच्यामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तसेच बाॅम्बहल्ल्याची भीती (Fear of bombing) होती.युध्दाला झाल्यानंतर विद्यापीठ बंद करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना घरी परतण्यास सुचना देण्यात आल्या.दरम्यान , अनिकेतसह भारतीय चार विद्यार्थी होते.

या भारतीय पाच विद्यार्थांच्या गृपने सिम्फोरोपोल ते माॅस्को असा सुमारे २००० हजार कि.मी.चा रेल्वेने (Railways) तब्बल ३४ तास प्रवास करत माॅस्को शहर गाठले.
दरम्यान , माॅस्कोमध्ये वाहतुक सेवा ठप्प असल्याने चार दिवस इथेच काढावे लागले.

अनिकेतने सांगितले की, कोणत्याही हाॅटेलात त्यांना घेतले जात नव्हते.याठिकाणी कुणीही आम्हाला कोणत्याच प्रकारची मदत केली नाही.पुर्ण दिवस व रात्र आम्ही विमानतळावर (airport) कशीबशी घालवली. नंतर अनिकेतच्या वडीलांच्या मित्राच्या मध्यस्थीने एका हाॅटेलात राहण्याची सोय झाली.तेथे त्यांनी चार दिवसांचा मुक्काम केला.वाहतुक सुरळीत झाल्यानंतर दि.६ मार्च रोजी माॅस्को ते दिल्ली (Moscow to Delhi) विमानाने प्रवास करून दि.७ मार्च रोजी दिल्ली ते मलकापुर रेल्वेने प्रवास करीत घरी सुखरुप परतले.

रशियामध्ये प्रवासाबाबत किंवा तेथुन परतण्यासाठी कोणत्याही शासकीय व्यक्तीने मदत केली नाही, अशी माहिती अनिकेतने दिली. अनिकेत याच्यासोबत पंजाब,केरळ तसेच नागपूर मधील चार विद्यार्थी होते. विद्यापीठ ते माॅस्को पर्यतचा प्रवास अतिशय खडतर झाला.तसेच भोवताली युध्दजन्य परीस्थिती (Warlike conditions) असल्याने विद्यार्थी भेदरलेल्या अवस्थेत होते.पाऊलोपावली मरणाची भीती (faces our death) होती.असा अनुभव अनिकेतने आपबीती कथन केली. एका छोट्या खेड्यातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थी परदेशातुन युध्दजन्य परिस्थितीतून सुखरुप घरी परतल्याने कुटुंबीय , मित्र व नातेवाईक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे घरी परतल्यानंतर त्याचे स्वागत करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या