Friday, April 26, 2024
Homeजळगावकोरोनामुक्त आ.मंगेश चव्हाण यांचे जोरदार स्वागत

कोरोनामुक्त आ.मंगेश चव्हाण यांचे जोरदार स्वागत

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच दि.२२ ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर…

- Advertisement -

मुंबई येथीलच निवासस्थानी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला होता. आमदार मंगेश चव्हाण हे कोरोनावर मात करून आज दि.९ सप्टेंबर रोजी चाळीसगाव मतदारसंघात परतले. यावेळी पिलखोड, टाकळी प्रदे, आडगाव, देवळी येथील हितचिंतक व कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण करून फुल उधळत स्वागत केले. तर चाळीसगाव येथील मालेगाव नाका येथे नगरसेविका सौ. विजयाताई प्रकाश पवार यांनी देखील त्यांचे औक्षण करत स्वागत केले. तर भाजपाच्या अंत्योद्य जनसेवा कार्यालयात देखील त्यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.

कोरोना काळात जनतेसाठी आपल्या जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून चाळीसगाव वासीयांच्या सेवेसाठी तत्पर असणारे आमदार मंगेश चव्हाण हे १७ दिवसांच्या कालावधीनंतर कार्यालयात येत असल्याने तेथे सेवा देणार्‍या पदाधिकारी व कर्मचारी यांनीदेखील आमदार चव्हाण यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी त्यांनी केक कापून आमदारांचा वाढदिवस साजरा केला. अनपेक्षितपणे झालेल्या या स्वागताने आमदार मंगेश चव्हाण देखील भारावले.

- Advertisment -

ताज्या बातम्या