Friday, April 26, 2024
Homeनाशिककृषी विभागातर्फे आठवडे बाजार

कृषी विभागातर्फे आठवडे बाजार

नाशिक । दि.२१ प्रतिनिधी

शहरी भागातील लोकांना रानभाज्यांची ओळख व्हावी व त्यांचे औषधी गुणधर्म सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती व्हावे. याकरिता कृषी विभागातर्फे रानभाजी व सेंद्रिय शेतीमाल नियमित आठवडे बाजार नाशिकमध्ये सुरू करण्यात येत आहे.

- Advertisement -

या नियमित आठवडे बाजाराचा शुभारंभ कार्यक्रम रविवारी ( दि.२३) सकाळी १० वा. नाशिक पंचायत समिती आवारात आयोजित करण्यात आला आहे. एक दिवसीय आठवडे बाजाराचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येतात. रानभाज्या ह्या शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळून येताट.त्या गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. रान भाज्यांमध्ये कंद भाज्या उदा.करवंदे ,कनगर, कडूकंद कोणचाई ,आळू इत्यादी.

हिरव्या भाज्या उदा. तांदूळका, काठेमाठ, कुडा, टाकळा ,कोराळा, कुरडू, घोळ ,कवळा ,लोथ इत्यादी, फळ भाज्या उदा.करटोली, वाघेडी, चिचोरडी,पायार, मोह, कपाळफोडी ,काकड इत्यादी व फूल भाज्या उदा. कुडा, शेवळ,उळशी इत्यादी प्रकारच्या रानभाज्या जिल्ह्यात आढळून येतात.

कार्यक्रमास आपण उपस्थित राहून रानभाज्या व सेंद्रिय शेतीमाल याबाबत माहिती जाणून घ्यावी.तसेच याबाबत आपले नातेवाईक व मित्र परिवारास सुध्दा याबाबत माहीती देवून प्रसार करावा,असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी रमेश शिंदे यांनी केले आहे.

रानभाज्या खा ! आरोग्य राखा !

शहरी भागातील लोकांना रानभाज्यांची ओळख व्हावी व त्यांचे औषधी गुणधर्म सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती व्हावी.याकरिता रानभाजी व सेंद्रिय शेतीमाल नियमित आठवडी बाजार नाशिकमध्ये सुरू करण्यात येत असून तो प्रत्येक रविवारी एक दिवसासाठी भरविण्यात येणार आहे. पंचायत समिती नाशिक आवार, त्र्यंबकरोड, बांधकाम भवन समोर, नाशिक येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत रानभाज्या खरेदी करता येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या