Wednesday, April 24, 2024
Homeजळगाववीकेण्ड लॉकडाऊनला नागरिकांचा हरताळ

वीकेण्ड लॉकडाऊनला नागरिकांचा हरताळ

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

बे्रक द चैन साठी शासनाकडून वीक एन्ड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळपासून विकेन्ड लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे.

- Advertisement -

परंतु नागरिकांकडून त्याच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे शहरात दिसून येत आहे. तसेच दिवसभर नागरिकांची रेलचेल सुरु मात्र दुपारच्या सुमारास तापमानात वाढ झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून बे्रक द चैनची घोषणा केली आहे. यात आठवड्यातील आठवड्याभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर संपुर्ण अस्थापना, कार्यालये संपुर्ण बंद करुन कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.

तर शुक्रवारी सायंकाळपासून ते सोमवारी सकाळपर्यंत विकेन्ड लॉकडाऊनच्या अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाने काढले आहे.

आज विकेन्ड लॉकडाऊनचा पहिला दिवस असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी असून अनेक व्यापारी सकाळपासून व्यापारी संकुलात ठाण मांडून बसले होते.

पोलिसांकडून कसून चौकशी

विकेन्ड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक चौकाचौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. पोलिसांकडून येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाची विचारपूस करुनच त्यांना सोडण्यात येत होते. तसेच विनाकारण रस्त्याने फिरणार्‍यांना देखील पोलिसांनी आपल्या काठीने चांगलाच प्रसाद दिल्याने अनेक रिकामटेकड्यांनी हे बघताच दुरुनच त्यांनी पळ काढला.

नियम मोडणार्‍यांवर कडक कारवाई

कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बधांसह लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. परंतु नागरिकांकडून त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने अजूनही नागरिक रस्त्यांवर विनाकारण फिरत असून विना मास्क फिरतांना आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्यासह इतर आपल्या कुटुंबांचे आरोग्य धोक्यात घाल नये यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचचली जात असून त्यांच्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई देखील केली जात आहे.

दुपारच्या सुमारास रस्ते ओस

सकाळच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यांवर नागरिकांची रेलचेल दिसून आली. परंतु दुपारच्या सुमारास तापमानाचा पारा चांगलाच वाढलेला असल्याने कडक उन्हाचे चटके सहन करावे लागत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. मात्र सायंकाळनंतर पुन्हा रस्त्यावर गर्दी दिसून आल्याने सकाळी रेलचेल तर दुपारी शुकशुकाट दिसून आला.

लॉकडाऊनबाबत संभ्रमच

विकेन्ड लॉकडाऊनमधून दूध केंद्र, किरणा दुकान, भाजीपाला विक्रेत, औषधी दुकाने अशा अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहे. सकाळच्या सुमारास लॉकडाऊनबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याने अनेक दुकानादारांनी व्यापारी संकुलांमध्ये येवून गर्दी केली होती. परंतु पोलिसांनी याठिकाणी धाव घेत गर्दी पांगविण्यात आली.

कागदपत्रे नसलेल्यांवर कारवाई

पोलिसांकडून वाहनचालकांची तपासणी केली जात आहे. यात वाहनांच्या कागदपत्रांची चौकशी केली जात आहे. ज्या वाहनचालकाकडे वाहनाची कागदपत्रे नसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र कारवाई टाळण्यासाठी अनेक वाहन चालक मुख्य रस्त्यांचा वापर न करता गल्ली बोळांतून वाहने नेत असल्याचे चित्र शहरात दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या