Saturday, April 27, 2024
Homeनगरलग्नातील आहेराचे 2 लाख 51 हजार रुपये वंचितांच्या वसतिगृहासाठी

लग्नातील आहेराचे 2 लाख 51 हजार रुपये वंचितांच्या वसतिगृहासाठी

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) –

सामाजिक उत्तरदायित्व म्हणून येथील स्नेहप्रेम संचिलत उचल फाउंडेशनच्या ऊसतोड कामगारांच्या मुला – मुलींच्या वसतिगृह

- Advertisement -

इमारत बांधकामासाठी मुलाच्या लग्नात आहेर म्हणून जमा झालेली 1 लाख व स्वत: 1 लाख 51 हजार अशी 2 लाख 51 हजार रुपयांची रक्कम भेट देऊन समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श येथील रोटरी क्लबचे माजी सहप्रांतपाल डॉ. संजय लढ्ढा व डॉ. मनीषा लढ्ढा यांनी निर्माण केला.

येथील या डॉक्टर दाम्पत्याचे चिरंजीव डॉ. वेदांत यांचा विवाह राजश्री व सतीश भक्कड यांची कन्या डॉ. कोमल हिच्याशी औरंगाबाद येथे साध्या पद्धतीने नुकताच झाला. वैद्यकिय व्यवसाय सांभाळून अंनिस, रोटरी क्लब व इतर सामाजिक संस्थाच्या कार्यात सतत पुढाकार घेणार्‍या डॉ. लढ्ढा दाम्पत्याने त्यांचा मुलगा डॉ. वेदांत याच्या विवाहाप्रित्यर्थ साखरपुडा शेवगाव येथे साजरा केला.

तर विवाह औरंगाबाद येथे पारंपारिक पद्धतीने नुकताच संपन्न झाला. या विवाहप्रसंगी आहेर न करण्याचे आवाहन करून ती मदत सामाजिक संस्था उचल फाउंडेशनच्या वसतिगृह इमारत बांधकामासाठी देण्याचे त्यांनी आवाहन केले होते. त्यानुसार उचल फाऊंडेशनने साखरपुडा व विवाह प्रसंगी संस्थेचा स्टॉल लावला होता.

या आवाहनाला प्रतिसाद म्हणून उचल फाउंडेशन संस्थेकडे सुमारे 37 हजार रुपयांची आहेराची रक्कम जमा झाली होती. तर डॉ. लढ्ढा दाम्पत्याकडे यांच्याकडे सुमारे 63 हजार रुपयांचा आहेर जमा झाला होता. डॉ. लड्डा दाम्पत्यांनी त्यात 1 लाख 51 हजार रुपयांची भर टाकून अशी सुमारे 2 लाख 51 हजार रुपयांची मदत डॉ. लड्डा दाम्पत्यांनी उचल फाउंडेशनच्या वसतिगृह इमारत बांधकाम उपक्रमास धनादेशाद्वारे दिली.

शहरातील ब्राह्मणगल्ली येथे एक वाडा उचल फाउंंडेशन संस्थेस मिळाला असून त्याठिकाणी ऊसतोड कामगार, अनाथ मुले-मुली यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. तेथे सुसज्ज इमारत व्हावी ही संस्थेची अपेक्षा होती. त्यात डॉ. लड्डा दाम्पत्याने विवाहप्रित्यर्थ आर्थिक मदत केल्याने वसतिगृह इमारतीचे भुमिपूजन रविवारी (दि. 28) रोजी झाले. यावेळी समाज सेवक डॉ. बाबा आमटे यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन केले.केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या