Sunday, April 28, 2024
Homeनगरविवाह सोहळ्यासाठी 500 लोकांना परवानगी द्यावी

विवाह सोहळ्यासाठी 500 लोकांना परवानगी द्यावी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी 500 लोकांना परवानगी द्यावी, महानगरपालिकेने सर्व कर माफ करावे,

- Advertisement -

बँकांनी कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ द्यावी, तसेच वीज मंडळाने करोना काळातील वीज बिल माफ करावे, अशा मागण्याचे निवेदन मंगल कार्यालय चालक, मंडप, डेकोरेटर्स, केटरिंग, बँड संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.

येथील कोहिनुर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंगल कार्यालय चालक, केटरर्स, मंडप व लाईट डेकोरेटर्स, फ्लॉवर डेकोरेटर्स, बँड, गेट पॅकेज, घोडा, बग्गी, सनई चौघडा आदी विविध असोसिएशनचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.राज्य सरकारने 300 स्केअर फूट आकाराच्या एस.टी. बसमध्ये 50 प्रवाश्यांना प्रवास करण्याची परवानगी दिली.

मग, दहा हजार स्क्वेअर फूट ते दोन एकर क्षेत्रफळ असलेल्या मंगल कार्यालयात विवाहासाठी 500 लोकांना उपस्थित राहण्याचा परवानगी का देत नाही ? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. एका लग्न सोहळ्याद्वारे सुमारे 350 लोकांना रोजगार मिळतो. जिल्ह्यामध्ये किमान 700 मंगल कार्यालये आहेत.

त्यामुळे शासनाने जर परवानगी दिली तर लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो. थांबलेले अर्थचक्र वेगाने फिरू शकते. त्याचा फायदा अप्रत्यक्ष रित्या शासनाला कर रूपाने होणार आहे. याचाही शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.

या बैठकीस माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक धनंजय जाधव, बाळासाहेब बोराटे, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, दत्ता जाधव, चंद्रकांत फुलारी, राजेंद्र उदागे, अजय नरवडे, गणेश भुतारे, विश्वजित बोरा, चंद्रकांत मेहेत्रे, शांताराम राऊत, रमेश परतानी, सुरेश खरपुडे, प्रदिप शेठ पंजाबी, सुरेश रोकडे, अतुल जाधव, संजय जाधव, सूरज पडळे, अलीम सय्यद, नयूम शेख, बिलाल शेख, कय्युम शेख, सागर जाधव, अशोक काटकर, निशांत भोगे, रघुनाथ चौरे, सुनिल अरकल, पोपट राऊत, दिलावर शेख, संजय आकुबत्तीन, सुनिल साळवे यांच्यासह विविध असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या