Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशेअर बाजारातील कर आकारणी विषयावर वेबिनार

शेअर बाजारातील कर आकारणी विषयावर वेबिनार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आयकर विभागाच्या ( Income Tax Department ) कार्यप्रणालीमध्ये सातत्याने नवनवीन बदल होत आहे त्यामुळे करदात्यांच्या फॉर्म 26 ए एस मधील माहिती याचबरोबर ए आय एस मधून आपल्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती आयकर विभागाकडे सहजपणे उपलब्ध होत असते त्यामुळे आपण आयकर विवरणपत्र भरताना, आपण केलेल्या विविध प्रकारच्या गुंतवणुकी, शेअर्स खरेदी विक्री, सिक्युरिटीज, बॉण्ड, म्युच्युअल फंड आदींची सविस्तर माहिती आपण स्वतःहून आपल्या कर सल्लागारांना दिली पाहिजे असे मत माजी अतिरिक्त आयकर आयुक्त धर्मचंदजी पारख (Former Additional Income Tax Commissioner Dharmachandji Parkh)यांनी केले.

- Advertisement -

नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (North Maharashtra Tax Practitioners Association) व नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएअशन (Nashik Tax Practitioners Association)यांच्या संयुक्त विद्यमाने “शेअर व्यवहारांवरील कर आकारणी आणि आयकर कायद्यांतर्गत अनिवार्य ऑडिट” या विषयावर मार्गदर्शनपर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी, मार्गदर्शन करतांना सांगितले की, सध्या लोकांमध्ये क्रिप्टो करन्सी (Crypto currency) बद्दल अधिक उत्सुकता निर्माण झालेली आहे काही देशांमध्ये त्यास करन्सी म्हणून मान्यता मिळालेली असली, तरी भारतात अजून त्यास भारतीय करन्सी म्हणून मान्यता मिळालेली नाही परंतु कायदेशीररित्या त्यास परवानगी आहे, त्यामुळे गुंतवणूकदार देखील त्यात गुंतवणूक करत आहेत.

परंतु प्रत्यक्षात सरकार क्रिप्टो करेंसी बद्दल सकारात्मक नाही त्यामुळे क्रिप्टो करेन्सी वर होणाऱ्या व्यवहारांवर सर्वात जास्त कर लादत आहे तसेच करदात्यांना आयकर विवरणपत्र भरत असताना क्रिप्टो करेन्सी मध्ये होणाऱ्या तोट्याची सवलत इतर कुठल्या उत्पन्नात घेता येत नाही त्यामुळे करदात्यांनी, जागृतीने क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करताना कोणत्या करन्सीची निवड केली पाहिजे हे समजून घेतले पाहिजे.

यावेळी त्यांनी कोणत्या व्यवहारांसाठी कोणत्या नमुन्यात विवरणपत्र दाखल करावे. याबाबत माहिती देऊन त्यांनी उपस्थितांच्या शंकेचे निराकरण केले. यावेळी नॉर्थ महाराष्ट्र कर सल्लागार संघटनचे अध्यक्ष अनिल चव्हाण व नासिक कर सल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बकरे यांनी देखील मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन नितीन डोंगरे यांनी व आभार संजय निकम यांनी मानले. वेबिनारचे यशस्वीरित्या आयोजन करण्याकरिता प्रकाश विसपुते, अक्षय सोनजे, निखिल देशमुख, योगेश कातकाडे, संदीप गाढवे आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या