ऐन थंडीत राज्यातील थंडी गायब, बळीराजाच्या चिंतेत वाढ

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई । Mumbai

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीचे आगमन होत असते, ते यंदा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाले. त्यातही नाताळमध्ये थंडीत कमालीची वाढ झाल्याने राज्यात थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे.

राज्यातील विविध राज्यातील बहुतांश तापमान १५ अंशांच्या वर गेले आहे. राज्याच्या किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता शेतकऱ्याच्या शेतात गहू, हरभरा अशी हिवाळी पिके आहेत. त्यामुळे थंडी कमी झाल्याने शेतकऱ्याला फटका बसण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *