Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र'जलयुक्त शिवार’ च्या खुल्या चौकशीसाठी निवडावयाच्या कामांचा शोध घेण्याकरिता समिती गठित

‘जलयुक्त शिवार’ च्या खुल्या चौकशीसाठी निवडावयाच्या कामांचा शोध घेण्याकरिता समिती गठित

मुंबई lतालुका प्रतिनिधीl Mumbai

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून फक्त कामांची संख्या अधिक

- Advertisement -

असल्याने कोणती कामे खुल्या चौकशीसाठी निवडणे आवश्यक आहे, याचा शोध घेण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

सर्वांसाठी पाणी,टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची सुरुवात झाली. या अभियानाची मुदत दि. 31 मार्च 2019 पर्यंत होती. तदनंतर या अभियानास सन 2018-19 मध्ये निवडण्यात आलेल्या गावातील कामे पूर्ण करण्यासाठी दि.31 मार्च 2020 अखेर मुदतवाढ देण्यात आली होती.

अभियान आता संपुष्टात आले आहे. अभियान विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, लोकसहभाग व खासगी उद्योजक (CSR) यांच्याकडील उपलब्ध निधीतून राबविण्यात आले. 2015-16 ते सन 2018-19 अंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये सुमारे 6 लाखांच्या वर कामे करण्यात आली.

भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा दि.31 मार्च 2019 रोजी संपलेल्या वर्षाचा सामान्य आणि सामाजिक क्षेत्र व सार्वजनिक उपक्रमावरील वर्ष 2020 चा अहवाल क्रमांक -3 मध्ये महालेखापाल यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांबाबत नोंदविलेल्या मुद्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

*समितीतील सदस्य असे…*

1) श्री . विजय कुमार (सेवानिवृत्त अपर मुख्य सचि-अध्यक्ष 2) कार्यरत अतिरिक्त पोलिस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग , महा.राज्य)- सदस्य 3) श्री. संजय बेलसरे (मुख्य अभियंता जलसंपदा विभाग)-सदस्य 4) कार्यरत संचालक ( मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन,पुणे)- सदस्य

भारताचे नियंत्रक व लेखा परीक्षक यांच्या अहवालात नमूद 6 जिल्ह्यातील 120 गावांमध्ये तपासणी केलेल्या 1128 कामांपैकी कोणत्या कामांची खुली चौकशी करणे आवश्यक आहे व कोणत्या कामांमध्ये केवळ प्रशासकीय कारवाई किंवा विभागीय चौकशी करणे आवश्यक आहे याची शिफारस समिती संबंधित यंत्रणांना करणार आहे.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015 पासून प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील क्षेत्रीय यंत्रणाकडून मागविण्यात आले होते. त्यानुसार साधारणत: 600 च्या वर तक्रारींबाबतची माहिती प्राप्त झाली.

तक्रारींची छाननी करुन त्यानुसार कोणत्या कामांची खुली चौकशी करणे आवश्यक आहे व कोणत्या कामांमध्ये केवळ प्रशासकीय कारवाई किंवा विभागीय चौकशी करणे आवश्यक आहे याची शिफारस संबंधीत यंत्रणांना करावी लागणार आहे. याशिवाय समितीने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या व समितीला आवश्यक वाटेल त्या कोणत्या कामांची खुली चौकशी करणे आवश्यक आहे व कोणत्या कामांमध्ये केवळ प्रशासकीय कारवाई किंवा विभागीय चौकशी करणे आवश्यक आहे याची शिफारस संबंधीत यंत्रणांना करावी लागणार आहे.

समितीने शिफारस केल्याप्रमाणे संबंधित यंत्रणा त्या कामासंदर्भात खुली चौकशी अथवा प्रशासकीय कारवाई किंवा विभागीय चौकशी तात्काळ सुरु करणार आहे. समिती नेमून दिलेल्या कार्यकक्षेनुसार 6 महिन्यांमध्ये कामकाज पूर्ण करणार आहे. समिती दर महिन्याला शिफारशी केलेल्या सर्व प्रकरणांबाबत अहवाल शासनास सादर करणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या