Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकगर्मी मे भी थंडी का एहसास; उन्हाळ्यासाठी कलिंगड सज्ज

गर्मी मे भी थंडी का एहसास; उन्हाळ्यासाठी कलिंगड सज्ज

देवळाली कॅम्प | वार्ताहर Deolali

वाढत्या उन्हाने शहरवासीय हैराण झाले असून ‘गर्मी मे भी थंडी का एहसास’ देणाऱ्या रसदार फळांची रेलचेल दिसून येत आहे. उन्हाळ्यात शरीराचा दाह कमी करणारे टरबूज बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. यंदा हवामान व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणावर उत्पादन टरबूजचे झाले आहे…

- Advertisement -

उन्हाळ्याच्या तोंडावर मागणी असणारे रसरशीत फळे यंदा मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे फळांच्या खरेदीला शहरवासियांनी प्राधान्य दिले आहे. स्वस्त आणि मस्त फळांच्या हातगाड्या स्टॉल व टेम्पोमध्ये विक्री होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

शहरातील रस्त्याच्या कडेला मंडप टाकून तसेच हातगाड्यांवर टरबूज विक्रीसाठी जागोजागी व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी 15 ते 17 रुपये किलो ने मिळणारे टरबूज यंदा 20 ते 25 रुपये किलो ने विक्री होत आहे.

त्यातच पुढील महिण्यात रमजान असल्याने भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात शुगर किंग, बेबी शुगर, किरण या जातीचे टरबूज विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.

नाशिकमध्ये फेब्रुवारी ते मे या कालावधीत सोलापूर, जळगाव, भुसावळ, रायपूर, संगमनेर, गडचिरोली, बेंगलोर आदी भागातून कलिंगडाची मोठ्या प्रमाणावर आवक होते.

यंदा स्थानिक ठिकाणी देखील टरबूज निर्मिती झाली आहे. भगूर,लहावीत, पिंपळगाव बसवंत येथून माल येत आहे.

शुगर बेबी कलिंगड खाण्यासाठी गोड लागतात. त्यामुळे या मालाला उठाव चांगला आहे नाशिकच्या काळ्या- हिरव्या द्राक्षांनीही या फळांमध्ये आपले स्थान टिकून ठेवले असून ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहेत.

बच्चेकंपनी सह मोठ्यांनाही आंबट-गोड चवीने खाल्ले जाणारे अननस रु. ६० ते ८० रु.प्रतिनग प्रमाणे विक्री होत आहे. नागरिकांना बाजारात दाखल झालेला नाही व सध्या त्याच्या किमती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही.

त्यासाठी आणखी काही दिवसाची प्रतीक्षा करावी लागेल तरीही बाजारात बदाम 200 रुपये, व लालबाग 160 रुपये किलो ने विकला जात असून हापूस 1000 रुपये डझन ने विक्री होत आहे. त्यामुळे ग्राहकवर्ग स्वस्तात मिळणारे टरबूज, खरबूज, अननस, संत्री, मोसंबी आधी फळांना पसंती देत आहेत.

उन्हाळ्यात शरीरातील पाणी आणि साखरेचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी पाणीदार आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा आहारात मोठ्या प्रमाणात वावर होतो. त्यासाठी द्राक्ष, अननस, संत्री, मोसंबी, पपई, खरबूज या फळांना विशेष मागणी असते. त्यामुळे शरीराला आवश्यक विटामिन सी यासारखी जीवनसत्वही फळांमध्ये अधिक असल्याने त्याची ग्राहकांकडून मागणी वाढली असल्याचे फळविक्रेता अझीम बागवान यांनी देशदूतला सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या