Thursday, April 25, 2024
Homeजळगावजलमय जळगाव

जलमय जळगाव

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याकडून Weather department मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी सायंकाळपासूनच जिल्ह्यात मुसळधार पावसाला Torrential rain सुरुवात झाली. दरम्यान मंगळवारी दिवसभर पावसाची उघडीप सुरु होती. मात्र दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह With a thunderclap मुसळधार पावसाला सुरुवात झाली.त्यामुळे शहरातील सखोल भागात पाणी साचल्याने संपुर्ण जळगाव शहर जलमय झाल्याचे चित्र शहरात दिसून आले.

पुढील काही दिवस धोक्याचे हवामान विभागाने पुढील तीन दिवस जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच पुरस्थिती निर्माण झाल्यास त्याबाबत तात्काळ जिल्हा प्रशासनासोबत संपर्क साधावा

- Advertisement -

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

गेल्या महिनाभरपूर्वी पावसाने दडी मारल्याने बळीराजा संकटात सापडला होता. मात्र सलग दोन ते तीन दिवस पावसाने सलग हजेरी लावल्याने काही प्रमाणात का होईना पिकांना जीवदान मिळाले होते. मात्र खरीप हंगामातील पिके जळाल्याने शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून गेला होता.

दरम्यान तेव्हापासून पुन्हा पावसाने हुलकावणी दिली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपुर्वी हवामान खात्याकडून विदर्भ, खान्देश, मराठवाडयासह संपुर्ण राज्याला वादळी वार्‍यासह मुळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी सायंकाळपासून जळगाव जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली.

संपुर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने कधीकाळी कोरड्या पडलेली नदी, नाले देखील दुथडी भरुन वाहू लागले आहेत. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परंतु आज सकाळपासून पावसाची रिपरीप सुरु होती. परंतु दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड ते दोन तास मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील सखोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

विजांच्या कडकडाटाने भीती

दुपारच्या सुमारास विजांच्या कडकाडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु काही वेळानंतर पावसाची उघडीप झाल्यानंतर नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. या मुसळधार पावसाच्या धास्तीने अनेकांनी धसका घेतला आहे.

घरात पाणी शिरल्याने नागरिकांची दाणादाण

सुमारे दीड ते दोन तास सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील नवीपेठ, समता नगर, प्रजापत नगर, मेहरुण परिसर, बजरंग बोगदा, गोपाळपुरा, जूने जळगाव, हरिविठ्ठल नगर, खंडेराव नगर या भागात पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले होते. यामुळे नागरिकांची प्रचंड हाल झाल्याने त्यांच्या घरातील साहित्य खराब झाल्याची माहिती परिसारातील नागरिकांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या