Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यावॉटरग्रेस सेवकांचे काम बंद; रस्त्यावर घाणीचे साम्राज्य

वॉटरग्रेस सेवकांचे काम बंद; रस्त्यावर घाणीचे साम्राज्य

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरातील (nashik city) रस्त्यांवर साफसफाई करणार्‍या सफाई सेवकांनी (cleaning workers) अचानक काम आंदोलन (agitation) केल्यामुळे नाशिक शहरातील विविध भागांमध्ये कचर्‍याचे ढीग (Garbage piles) साचलेले आहे.

- Advertisement -

वॉटरग्रेस (Watergrace) ठेकेदाराकडून सेवकांना मारहाण (Beating) झाल्याची तक्रार मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) देण्यात आली असून उद्या (दि.17) सोमवारी सेवक महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) यांची भेट घेणार आहे. सुमारे पाचशे कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे (Maharashtra Navnirman Kamgar Sena) सदस्य स्वीकारले असून उद्या महापालिकेत कामगार सेनेचे फलक लावण्यात युनियन (Union) स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मनसेना शहराध्यक्ष माजी नगरसेवक दिलीप दातीर (Former Corporator Dilip Datir) यांनी दिली.

मागतील मागील दोन-तीन वर्षांपासून वॉटर ग्रेसच्या सेवकांवर ठेकेदारच अन्याय करत असल्याचा आरोप सेवकांनी केला आहे. कामावर लावताना पंधरा हजार रुपये डिपॉझिट घेतले असून 22 हजार रुपये पगार असताना अकाउंटमधून दहा ते पंधरा हजार रुपये कापून प्रकार होतात. त्याचप्रमाणे ठेकेदाराला (Contractor) याबाबत विचारणा केल्यावर तुमची आयडी ब्लॉक (ID block) करण्यात येईल अशी धमकी देऊन पैसे उकडण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप होत आहे. दिवाळीचा बोनस देखील सेवकांना देण्यात आलेला नाही

तसेच करोना काळातील पैसे देखील ठेकेदाराकडून कामगारांना मिळालेले नाही, कामगार आपल्या स्वतःच्या पगारातूनच झाडू किंवा इतर वस्तू आणतात तसे गेले तर महापालिकेच्या वतीने हे सर्व वस्तू देण्यात येतात. असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्र निर्माण सेनेचे सभासद (Member of Maharashtra Nirman Sena) स्वीकारल्यामुळेच कामगारांना ठेकेदारांनी बोलावून मारहाण केल्याची घटना घडल्याचे आरोप करण्यात येत आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

वॉटरग्रेसकडून सतत कामगारांवर अन्याय होत आहे. ते महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांकडे आले होते. सुरुवातीला शंभर लोकांनी सभासद व स्वीकारले. त्यातील काही जणांना बोलावून त्यांना मारहाण केली. कायद्यानुसार काम करणारे लोक आहे. आतापर्यंत 500 सेवकांनी महाराष्ट्र निर्माण कामगार सेनेचे सभासद स्वीकारले आहे. उद्या सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन तसेच युनियनचा फलक महापालिकेत लावण्यात येणार आहे. यावेळी कामगार सेनेचे संतोष धुरी, परशुराम साळवे, तुषार जगताप, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार उपस्थित राहणार आहे.

– दिलीप दातीर, शहराध्यक्ष, मनसेना

नाशिक सफाई ठेकेदार कंपनी वॉटरग्रेसने कामगारांना कामावर घेतांना त्यांच्याकडून 15,000 रुपये बेकायदेशीररित्या अनामत रक्कम घेतली आहे. या कंपनीने स्वतः मनपाला लेखी कबुली दिली आहे. कामगारांची पिळवणूक करणार्‍या या वादग्रस्त कंपनीची चौकशी व्हावी आणि कामगारांना न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कारवाईची मागणी करणार आहे.

– प्रवीण तिदमे, महानगर प्रमुख, शिवसेना, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या