Saturday, April 27, 2024
Homeनाशिकपाणीपुरवठा प्रश्नी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले; प्रत्यक्ष पाहणी

पाणीपुरवठा प्रश्नी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले; प्रत्यक्ष पाहणी

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम प्रगतीपथावर असून इंद्रनगरी आणि कामटवाडे ( Indranagari & Kamatvade )परिसरातील पाणीप्रश्न दोन दिवसांत सुरळीत होईल आणि अन्य मूलभूत समस्या तातडीने सुटाव्यात यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर ( Sudhakar Badgujar- Shivsena) यांनी दिली.

- Advertisement -

इंद्रनगरी, कामटवाडे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचा तुटवडा जाणवतो.या भागात खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे.घंटागाड्या व सफाई कामगार नियमित येत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे अशा तक्रारींचा पाढा परिसरातील महिलांनी वाचला आणि त्या आशयाचे निवेदन शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना दिले होते.त्याची तातडीने दखल घेत बडगुजर यांनी महापालिका प्रशासनाचे याबाबत लक्ष वेधले.

त्यानंतर पाणी पुरवठा अधिकारी गोकुळ पगारे,बांधकाम विभागाचे विनीत बिडवई यांनी बडगुजर तसेच शिवसेना विभागप्रमुख पवन मटाले,जितेंद्र भालेराव, राजेंद्र सुतार,सुभाष शुकले,दिनेश तेली,डॉ शरद बगडाने,रोहित शिंदे, परिसरातील महिला साधना मटाले, उज्वला अहिरे,पूनम महाजन,संगीता घाडगे ,विजया शिरोडे,मीना पाटील, ललिता पवार,कमिका गवळी,आशा सोनवणे,मीरा क्षीरसागर,मंगला शिंदे, स्वाती सोनी,हर्षदा पाटील,उषा महाजन,मंगला महाजन,सुप्रिया घाडगे,शिवानी घाडगे,दीपाली शिरोडे,मनिषा शिरोडे,रुपाली देशमुख,सोनाली खैरनार,पल्लवी अहिरे,दीपा पटेल आदींसमवेत परिसराचा दौरा करून प्रत्यक्ष समस्यांची पाहणी केली.

यावेळी जलवाहिनी जोडणीचे काम तातडीने हाती घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी कर्मचारीवर्गास दिल्याने दोन दिवसांत परिसरातील पाण्याची समस्या कायमस्वरुपी दूर होईल.तसेच घंटागाड्यां नियमित कशा धावतील याचे वेळापत्रक निश्चितीचे आदेश या अधिकाऱ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले. तसेच सफाई कर्मचारी नियमित येतील आणि परिसर कायम स्वछ राहील असे या अधिकाऱ्यांनी महिलावर्गास आश्वस्त केले.त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.तसेच या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी व महिलावर्गाने सुधाकर बडगुजर यांचे आभार मानले .

- Advertisment -

ताज्या बातम्या