Friday, April 26, 2024
Homeजळगावपाईपलाइन फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत

पाईपलाइन फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत

भुसावळ (प्रतिनिधी) bhusawal –

शहरातील नाहटा चौफुलीवरून खडका रोड पाण्याच्या टाकीला जोडणारी राय झिंग मेन पाईप लाईन दोन ठिकाणी फुटल्याने सदरच्या टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा बंद पडला आहे.

- Advertisement -

पालिका प्रशासनाच्यावतीने पाईपलाईच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. हे काम रात्री उशीरापर्यंत होऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. दरम्यान, या समस्येमुळे सदर परिसरातील नागरिकांना साधारण दोन दीवस विलंबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. या महामार्गावरुन अनेक ठिकाणी वाहनांसाठी वळण रस्ते तयार करण्यात आले आहे. या ठिकाणांवरुन अवजड वाहने जात असतात त्यामुळे महामार्गाशेजारीच असलेल्या पालिकेच्या नाहाटा चौफुली ते खडका रोड टाकीपर्यंत जाणारी पाईपलाइन सुहास हॉटेल व गणेश ढाबा या दोन ठिकाणी फुटून पाण्याची नासाडी झाली आहे.

याबाबत माहिती मिळताच पंपींग वरुन पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला आहे. पाईपलाईन लिकेज जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून ते काम रात्री उशीरापर्यंतप पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या कामामुळे गडकरी नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा दोन दिवस उशिराने होईल. दुरुस्तीनंतर पंपिंगवरील पंप बंद असलेला पंप सुरु करण्यात येईल त्यानंतर टाक्या पूर्ण भरल्यानंतर पाणी पुरवठ्याचे नियोजन होणार आहे.

दरम्यान खडका रोडल नाहाटा परिसर, तुकाराम नागर, देना नगर, पंढरीनाथ नगर, शिवपुर कन्हाळा रोड या भागात उशीरा पणी मिळणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन भुसावळ नगरपरिषदे कडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या