Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमालेगावात दोन दिवस पाणीपुरवठा बंद

मालेगावात दोन दिवस पाणीपुरवठा बंद

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

गिरणा पंपींग स्टेशनवर (Girna pumping station) वीजपुरवठा (Power supply) करणार्‍या दहिवाळ उपकेंद्र (Dahiwal substation) तसेच 33 केव्ही एक्स्प्रेस लाईनवर (KV Express Line) मान्सुनपुर्व देखभाल दुरूस्तीचे काम (Repair work) 4 जुनरोजी महावितरण (MSEDCL) कंपनीतर्फे केले जाणार आहे.

- Advertisement -

यामुळे 4 व 5 जुनरोजी होणारा पाणीपुरवठा (Water supply) एक दिवस उशीराने केला जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी (Municipal Commissioner Bhalchandra Gosavi) यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. महावितरण कंपनीतर्फे मान्सुनपुर्व देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असून गिरणा पंपींग स्टेशनसह दहिवाळ उपकेंद्र तसेच 33 केव्ही एक्स्प्रेस लाईनवर देखभाल दुरूस्तीचे काम केले जाणार आहे.

त्यामुळे 4 जुनरोजी येथील वीजपुरवठा बंद (Power off) ठेवला जाणार असल्याने पाण्याचे पंपींगचे काम देखील बंद राहणार आहे. यामुळे 4 व 5 जुनरोजी ज्या भागात पाणीपुरवठा (Water supply) होणार होता तो 5 व 6 जुनरोजी एक दिवस उशीराने केला जाणार आहे.

महावितरण कंपनीव्दारे देखभाल दुरूस्तीचे काम पुर्ण झाल्यानंतर गिरणा पंपींग स्टेशन येथून नियोजनाप्रमाणे एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. नागरीकांनी वरील अडचण लक्षात मनपास सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त गोसावी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या