पाणीसाठवण बंधारा कामाचा खर्च जाणार ‘पाण्यात’!

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी (Rahuri) तालुक्यातील ब्राम्हणी (Bramhani) येथील पाणीसाठवण बंधार्‍याचे काम अतिशय निकृष्ट (Water Storage Dam Work Very inferior) झाले असून ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शेतकर्‍यांना फायदेशीर ठरणारा हा उपक्रम ठेकेदाराच्या (Contractor) मनमानीमुळे रखडला असून त्यावर झालेला खर्च पाण्यात जाणार असल्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

ब्राम्हणी येथील सार्वजनिक विहिरी शेजारील ओढ्यात सुमारे 12 लाख रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलेलेआहे. हे काम अद्याप अपूर्णच राहिलेले आहे. या साठवण बंधार्‍याचा अनेक शेतकर्‍यांना फायदा होणार असून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. हे काम करणार्‍या ठेकेदाराला अधिकारी पाठीशी घालतात की काय? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बंधार्‍याच्या कामाला गत दीड-दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. मात्र, अद्यापही काम सुरु आहे हे विशेष! पाणी ज्या जागी साचणार आहे, त्या ठिकाणी माती व मुरूमाचा भराव पडून आहे. हा भराव कायम राहिल्यास पाणी नेमके कुठे साचणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. मग लाखो रुपये खर्च करून बंधार्‍याची जी भिंत बांधली, त्याचा उपयोग काय? याशिवाय त्या कामाला आवश्यक असणार्‍या गेटचे कामही अपूर्ण आहे. एकूणच एवढा मोठा निधी या कामावर खर्च केला. त्याचे भवितव्य काय? असा सवाल आता सुज्ञ ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

हे काम जिल्हा परिषद (ZP) लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून मंजूर आहे. हे काम उत्कृष्ट व दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा असताना मात्र, त्यांनी याकडे कानाडोळा करत काम निकृष्ट दर्जाचे केले आहे. कामाची पाहणी केली असता ही सर्व बाब समोर आली. यासंदर्भात संबंधित अधिकारी यांना संपर्क केला. कामाची पाहणी करतो, असे त्यांनी सांगितले. कामा संदर्भात अधिकारी ठेकेदाराला (Contactor) पाठीशी घालतात की काय? असा सवाल ग्रामस्थांनी (Villagers) विचारला आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *