Friday, April 26, 2024
Homeनगरपाथर्डी-शेवगावच्या पाणी योजनांच्या अडचणी सोडवा

पाथर्डी-शेवगावच्या पाणी योजनांच्या अडचणी सोडवा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातील (Pathardi-Shevgaon constituency) पाणी योजनांच्या अडचणीबाबत (Problems with water schemes) आ. मोनिका राजळे (MLA Monika Rajale) यांनी नुकतीच मुंबई येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना. गुलाबराव पाटील (Minister of Water Supply and Sanitation Gulabrao Patil) यांची भेट घेतली. यावेळी भगवानगड परिसर व 47 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (47 villages regional water supply scheme) तातडीने मार्गी लावणे, तसेच मतदारसंघातील अन्य प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाबाबत सविस्तर माहिती देऊन चर्चा केली. त्यावर मंत्री ना.पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत लवकरच स्वंतत्र बैठक घेण्याचे अश्वासन आ. राजळे (MLA Monika Rajale) यांना दिले.

- Advertisement -

आ. राजळे (MLA Monika Rajale) यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनूसार मंत्री पाटील (Minister Gulabrao Patil) यांची आ. राजळे यांनी नुकतीच मुंबई भेट घेऊन पाथर्डी तालुक्यातील भगवानगड (Bhagwangad) परिसर व 47 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तातडीने मार्गी लावणे, माळी बाभुळगाव व 49 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, तसेच शेवगाव (Shevgav) तालुक्यातील हातगाव व 28 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, बोधेगाव व इतर 7 गावे योजना, पाथर्डी- शेवगाव पाणी पुरवठा योजनेतील (Pathardi- Shevgaon Water Supply Scheme) अमरापूर, शहरटाकळी व 24 गावे योजना, या सुरळीत चालण्यासाठी, त्यामधील अडी अडचणी सोडविणे, कालबाह्य झालेल्या योजना संदर्भात निर्णय घेऊन नवीन योजना प्रस्तावित करणे याबाबत ना.पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.

या सर्व योजनांच्या अडचणीबाबत लवकरच ना. पाटील यांच्या उपस्थितीत संबंधित विभागाचे अधिकारी, पदाधिकारी यांच्या समवेत मंत्रालयातील दालनात तात्काळ बैठक आयोजीत करण्याचे आदेश ना.पाटील यांनी अधिकार्‍यांना दिले अशी माहिती आ. राजळे (MLA Monika Rajale) यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या