Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा

जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

एप्रिल महिना ( April Month ) सुरु होताच जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा (Water scarcity )असह्य होत असून ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत रहावा यासाठी टँकरचे ( Water Tankers) नियोजन केले असून त्यामध्ये सुरुवातीला सहा टँकर सुरू केले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, यंदाच्या हंगामात जिल्ह्यात पहिला टँकर येवला तालुक्यात सुरु झाला. या ठिकाणी तीन टँकर आहेत. तर बागलाण व सिन्नर तालुक्यात प्रत्येकी दोन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काळात टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. टंचाई शाखेच्या अहवालानुसार 579 गावे आणि 922 वाड्यांमध्ये टँकरची गरज भासू शकते.

मागील दोन वर्षांपासून वरुणराजाने समाधानकारक हजेरी लावल्याने जिल्ह्यातील धरणांत आजमितीला पन्नास टक्क्यांहून अधिक जलसाठा आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत पाणी टंचाई फारशी जाणवली नाही. पण एप्रिल सुरु होताच जिल्ह्यात अनेक गाव, वाड्या व वस्त्यांवर पाण्याच्या दुर्भिक्ष्याला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव प्राप्त होत आहेत. सर्वाधिक टंचाई ही दुष्काळी भाग असलेल्या येवला, बागलाण, सिन्नर तालुक्यात आहे. येवल्यात तीन तर बागलाण व सिन्नर तालुक्यात प्रत्येकी दोन टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. जसजसे प्रस्ताव प्राप्त होतील तशी लगेच टँकरला मंजुरी दिली जाईल, अशी माहिती टंचाई शाखेकडून देण्यात आली आहे.

यंदा आठ कोटींचा टंचाई आराखडा

यंदा जिल्ह्यात दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी आठ कोटींचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. पाणी पुरवठ्यासाठी टँकरवरच भीस्त आहे. 305 गावे आणि 530 वाड्यांसाठी 167 टँकरची आवश्यकता असून त्यासाठी सव्वापाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या