Wednesday, April 24, 2024
Homeनगरपाणीप्रश्न सोडविण्यासाठी नदीतील बंधारे भरा

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नदीतील बंधारे भरा

बेलापूर |वार्ताहर| Belapur

प्रवरा नदीपात्रातील कोल्हापूर टाईप बंधारे कोरडे पडल्याने पाणी योजना कोलमडल्या आहेत. तसेच भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने या धरणातून पाणी सोडून नदीपात्रातील बंधारे भरण्यात यावेत, अशी मागणी बेलापूर खुर्दचे उपसरपंच अ‍ॅड. दिपक बारहाते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वडाळा पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

- Advertisement -

बेलापूर खुर्द येथील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने वडाळा येथील पाटबंधारे उपअभियंता कार्यालयातील अधिकारी अमोल आठरे व दाभाडे यांना या मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, प्रवरा नदी नदीपात्रातील कोल्हापूर टाईप बंधार्‍यातील पाणी आटल्याने बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे नागरिक व जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने त्यांचे आतोनात हाल होत आहेत. तसेच भंडारदरा आणि निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यातील पाणी सोडून नदीपात्रातील कोल्हापूर टाईप बंधारे भरण्यात यावेत.

निवेदनावर उपसरपंच अ‍ॅड. दिपक बारहाते, ग्रा.पं.सदस्य वसंत पुजारी, दिलीप भगत, राजेंद्र बारहाते, अनिल गाढे, प्रणाली भगत, नयना बडधे, सविता राजुळे, राणी पुजारी, कल्पना भगत यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ सुरेशराव महाडिक, शंकरराव गाढे, बाळकृष्ण वाकडे, मधुकर पुजारी, जगन्नाथ महाडिक, नारायणराव वाकडे, रामदास गाढे व दिलीपराव खर्डे यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या