Friday, April 26, 2024
Homeनगरपाच महिने विद्युत पंप बंद असताना बिल कशाचे भरायचे

पाच महिने विद्युत पंप बंद असताना बिल कशाचे भरायचे

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, चांदेकसारे, पोहेगाव भागात विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडून शेतकर्‍यांना आपआपल्या रोहित्रा वरील विज बिल भरण्याचे संदेश पाठवण्यात आले. पाच महिन्यापासून विद्युत पंप बंद असताना वीज बिल कोणते भरायचे असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहे.

- Advertisement -

जुलै ते डिसेंबर मध्ये अतिवृष्टीच्या पावसाने हाहाकार उडवला होता. अजूनही काही भागात रब्बीच्या पिकांसाठी शेतकर्‍यांच्या जमिनीच्या मेहनती देखील झाल्या नाहीत. तरी देखील या महिन्याचे वीज बिल शेतकर्‍यांना दिले गेले. आधीच शेतकरी अडचणीत असताना व पिके उभी करण्यासाठी तयारी करत असताना वीज वितरण कंपनीने विज बिल भरा मोहीम सुरू केली. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली.

अनेक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना आधार देत मंत्रालयापर्यंत या संदर्भात आवाज उठवला आहे. ही बाब प्रशासनाच्या लक्षात येतात पुन्हा वीज तोडणी मोहीम थांबवण्याचा फतवा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून काढण्यात आला आहे. कृषी पंप धारकांचा वीज पुरवठा चालू बिल किंवा थकबाकी वसुली करता तसेच इतर कोणतेही कारणास्तव पुढील आदेशापर्यंत खंडित केला जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या