Saturday, April 27, 2024
Homeनगरइलेक्ट्रीक मोटार व घरफोडी करणार्‍या चौघांना राजूर पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक

इलेक्ट्रीक मोटार व घरफोडी करणार्‍या चौघांना राजूर पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक

राजूर |वार्ताहर| Rajur

शेतकर्‍यांच्या इलेक्ट्रीक मोटार व घरफोडी चोरी करणार्‍या अकोले तालुक्यातील पुरूषवाडी येथील चौघांना राजूर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.

- Advertisement -

यांसंबंधी दि. 04/04/2022 रोजी पांडुरंग शंकर भांगरे, रा. पुरुषवाडी, ता. अकोले यांनी राजूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, त्यांची पुरुषवाडी गावचे शिवारातील कुरकुंडी नदीचे किनार्‍यावर बसवलेली ए.एम.यु. सबमर्सिबल कंपनीची 7.5 हॉर्सपावरची इलेक्ट्रीक मोटार दि. 27/03/2022 रोजी ते दि. 04/04/2022 चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. या तक्रारीवरून राजूर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

राजूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून याप्रकरणी गणेश गोमा कोंडार (वय 30), दिनेश पंढरीनाथ भांगरे (वय 22), ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानदेव इंद्रजीत घोडे (वय 30) व गोरख त्रिंबक कोंडार (वय 25) सर्व रा. पुरुषवाडी, ता. अकोले यांना ताब्यात घेतले असून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. चोरी गेलेला मुद्देमाल आरोपींकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे.

त्यांचकडे अधिक विचारपुस करता आरोपी गणेश कोंडार व दिनेश भांगरे यांनी राजूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 16/2022 भा.दं.वी. कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील इलेक्ट्रिक मोटार चोरी केल्याची कबुली देऊन त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच यातील आरोपींकडे राजूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 61/2022 भा.दं.वी. कलम 457,380 प्रमाणे मधील चोरीस गेलेल्या रकमेबाबत अधिक चौकशी केली असता यातील आरोपी गोरख त्रिंबक कोंडार, रा. पुरुषवाडी याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याचेकडून 9,500/-रु. रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

या आरोपींकडून 1,10,000/- रु. किमतीची एम.एच.14 पी. 4852 सिल्व्हर रंगाची मारुती व्हॅन, 35,000/-रु. किमतीची ए.एम.यु. सबमर्सिबल कंपनीची 7.5 हॉर्सपावरची इलेक्ट्रीक मोटार, 10,000/- रु. किमतीची इलेक्ट्रीक पानबुडी मोटार व 9,500/-रु. रोख रक्कम असा एकूण 1 लाख 64 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस स्टेशनचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व पो. हे. कॉ. कैलास नेहे, पो. कॉ. विजय फटांगरे, पो. कॉ. आकाश पवार, पो. कॉ. अशोक काळे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या