टंचाई टाळण्यासाठी पाणी नियोजन आवश्यक

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मार्चच्या( March Month )प्रारंभी जिल्ह्यात उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली असताना दुसरीकडे धरणांच्या साठ्यातही घट होऊ लागली आहे. जिल्ह्यातील प्रमुख 24 प्रकल्पांमध्ये आजमितीस 42 हजार 274 दलघफू साठा उपलब्ध आहे.पावसाळ्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे(Water planning is essential to avoid scarcity ).

गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडल्याने त्याचा फायदा पाण्याच्या स्रोतांना झाला आहे. मार्चच्या प्रारंभीच जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये 64 टक्के साठा आहे. प्रमुख धरण समूह असलेल्या गंगापूर समूहातील चार प्रकल्पांमध्ये उपयुक्त साठा 6984 दलघफू म्हणजे 69 टक्के आहे. दारणा समूहातील सहा धरणे मिळून 11 हजार 191 दलघफू साठा उपलब्ध असून, त्याची टक्केवारी 59 टक्के इतकी आहे. पालखेड समूहात 5534 दलघफू (66 टक्के), तर ओझरखेड समूहात 2278 दलघफू (71 टक्के) पाणीसाठा आहे.

गिरणा खोर्‍यातही यंदा पाणी मुबलक आहे. चणकापूर समूहात 14799 दलघफू साठा असून, त्याचे प्रमाण 64 टक्के आहे. पुनद समूहातील दोन प्रकल्प मिळून 1280 दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यातच मान्सूनच्या आगमनासाठी जवळपास 100 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी पुरवावे लागणार असल्याने जिल्हावासीयांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.

धरणसाठा (दलघफू)

गंगापूर 3547

काश्यपी 1753

आळंदी 500

करंजवण 4322

ओझरखेड 1516

तीसगाव 351

मुकणे 4053

कडवा 479

भोजापूर 91

हरणबारी 851

नागासाक्या 212

पुनद 1124

दारणा 4493

गौतमी गोदावरी 1184

पालखेड 232

वाघाड 980

पुणेगाव 411

भावली 942

वालदेवी 967

नांदूर-मध्यमेश्वर 257

चणकापूर 1614

केळझर 332

गिरणा 11790

माणिकपुंज 156

एकूण 42274

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *