Saturday, April 27, 2024
Homeनाशिकइंदिरानगर परिसरात पाणी मीटर चोरतय कोण?

इंदिरानगर परिसरात पाणी मीटर चोरतय कोण?

इंदिरानगर | Indiranagar

इंदिरानगर परिसरातून (Indiranagar) सोसायटीमध्ये पाणी मोजण्यासाठी बसविण्यात आलेले पाण्याचे मीटर चोरीला (Water meter) जाण्याचे प्रमाण वाढलेले असून चोरीला गेलेले मीटरची किंमत साधारणत: चार ते सहा हजार रुपये आहे, याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे.

- Advertisement -

याबाबत नागरिकांनी दक्ष रहावे असे आवाहन इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या (Indiranagar Police Station) वतीने वपोनी निलेश माईनकर (Nilesh Mainkar) यांनी केले आहे.

पाणीचोरी रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून (Nashik NMC) सोसायट्यांना पाणीमीटर बसविण्यात आले असले तरी या सोसायटीमध्ये मीटरची चोरी होत असल्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.

चोरीला जात असलेल्या मीटरची किंमत चार ते सहा हजार पर्यंत आहे. दरम्यान, पाणी मीटरचोरी करणारे चोरटे ओम रेसिडेन्सी श्रद्धा विहार या सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. या चोरट्याच्या त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या