मनमाड रेल्वे स्थानकात गळती

jalgaon-digital
3 Min Read

मनमाड | बब्बू शेख

प्रवाशांना सर्व सोयीसुविधा देण्यासाठी कोट्यावधी रूपयांची विकास कामे (Development works) साकारून मनमाड रेल्वे स्थानकाला (Manmad railway station) मॉडेल रेल्वे स्टेशन (Model railway station) केले जात असल्याचा दावा रेल्वे प्रशासनातर्फे केला जात आहे…

थोडा पाऊस जरी झाला तर संपूर्ण रेल्वे स्थानकावर पाणीच पाणी होत असल्याने या स्थानकाच्या कायापालटासाठी होत असलेला खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत असल्याने या नित्कृष्ट कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणी संतप्त प्रवाशांतर्फे (Passengers) केली जात आहे.

मनमाडला (Manmad) रात्री झालेल्या धुवांधार पावसामुळे रेल्वे स्टेशनच्या सर्वच प्लॅट फार्मवरील छतांना मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने ठिकठिकाणी छतातून पावसाच्या पाण्याच्या धारा लागल्या होत्या.

प्लॅट फार्म क्रमांक 1 व 2 वर तर छतातून इतके पाणी गळत होते की प्रवाशांना उभे राहणे देखील कठीण झाल्याने त्यांचे अतोनात हाल झाले. उभे राहायचे कुठे व सामान ठेवायचे तरी कुठे? असा प्रश्न पावसाच्या पाण्यात भिजत असलेल्या संत्रस्त प्रवाशांना पडला होता.

प्रवाशांना सर्व सुविधा देण्यात येत असल्याचा रेल्वे प्रशासनाकडून केला जाणारा दावा फोल ठरून पहिल्याच पावसात रेल्वे प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. मॉडेल स्टेशन असे असते का? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे लाखो रुपये खर्च करून सर्व प्लॉट फॉर्मच्या छतावरील सिमेंटचे पत्रे काढून त्याजागी लोखंडी पत्रे बसविण्यात येत आहे तरी देखील पाण्याची गळती काही थांबली नाही. त्यामुळे लाखो रुपये वाया गेले असून या प्रकरणाची संखोल चौकशी केल्यास अनेक गैरप्रकार देखील उघडकीस येतील, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात (Bhusawal section of Central Railway) मनमाड रेल्वे स्टेशन महत्वाचे जंक्शन मानले जाते. येथून देशाच्या कानाकोपर्‍यातून रोज तब्बल 125 पेक्षा जास्त प्रवाशी गाड्यांची ये-जा होत असल्याने सर्वच प्लॅटफार्मवर प्रवाशांची मोठी वर्दळ असते.

मात्र करोनामुळे (Corona) सध्या मोजक्या रेल्वे धावत असल्यामुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. रेल्वे प्रशासनाने देशभरातील ज्या मोजक्या रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याची घोषणा केली आहे त्यात मनमाड रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे.

त्यामुळे या रेल्वे स्थानकाला मॉडेल स्टेशन बनविण्यासाठी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली जात आहे. मात्र दुसरीकडे पहिल्याच पावसाने रेल्वे प्रशासनाचे पितळ उघडे पडले असून मध्य रात्रीनंतर शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला.

सुमारे 3 ते 4 तास जोरदार पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे (Rain) रेल्वे स्टेशनच्या सर्वच प्लॉट फार्मवरील छतांना मोठ्या प्रमाणात गळती लागलेली होती. ठिकठिकाणी छतातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. रेल्वे स्थानकाला हायटेक करा, परंतु सर्वप्रथम पावसापासून बचाव होईल यासाठी शेडमधून गळणारे पाणी थांबवा, अशी मागणी संतप्त प्रवाशांतर्फे केली जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *