Friday, April 26, 2024
Homeनाशिकदारणा, मुकणे, गंगापूरमधून २४०० दलघफुचे आवर्तन

दारणा, मुकणे, गंगापूरमधून २४०० दलघफुचे आवर्तन

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

रब्बीसह पिण्याच्या पाण्यासाठी दारणा, मुकणे आणि गंगापूर या धरणांतून २४०० दलघफू आवर्तन सुरु झाले आहे. पिण्याच्या पाण्याची चोरी होऊ नये यासाठी नदीकाठच्या अनाधिकृत उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा विज पुरवठा ३१ जानेवारीपर्यंत दरररोज २२ तास खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी विज वितरण कंपनीला दिले आहेत.

- Advertisement -

यंदा धरणांमध्ये मुबलक पाणी असल्याने आवर्तनांचीही निश्चित झालव आहे. या कालवा समित्यांच्या संमतीनुसारच आता रब्बीत आवर्तने देण्यास सुरुवात झाली आहे. दारणा, मुकणे आणि गंगापूर या धरणातून मिळून २४०० दलघफू इतके पाणी सोडण्यात येणार आहे.

त्यातील ९०० दलघफू हे बिगर सिंचन अर्थात पिण्यासाठी आणि १५०० दलघफू इतके पाणी सिंचानासाठी देण्यात येणार आहे. पण सिंचानालाही ते नेमके कुणाला द्यायचे हे देखील स्पष्ट आहे.

त्यामुळे मध्येच त्याची चोरी होऊ नये, पिण्याचे पाणी सिंचनाला वापरले जाऊ नये यासाठी या नदी आणि कालव्यांवरील अनाधिकृत उपसा कऱण्याची शक्यता असलेल्या विज पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केले जाणार आहे. तरीही डोंगळे टाकून अथवा इतर मार्गाने पाणी चोरी होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे जलसंपदा विभागाने भरारी पथकांची नियुक्ती करावी, तसेच जेथे शक्य तिथे पोलीस बंदोबस्त तैनात करावा. पोलीस विभागानेही जलसंपदा विभागाकडून मागणी आल्यास त्यांना तात्काळ पोलीस बळ उपलब्ध करुन द्यावे. शक्य तेथे संबधितांवर गुन्हे दाखल करावे. असे स्पष्ट आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या