Monday, April 29, 2024
Homeनाशिकगंगापूर धरणातून पहिला विसर्ग; गोदामाई पहिल्यांदाच खळाळली

गंगापूर धरणातून पहिला विसर्ग; गोदामाई पहिल्यांदाच खळाळली

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिककरांसह मराठवाड्याच्या नजरा खिळलेल्या गंगापूर धरणातील जलसाठा (Gangapur Dam Water Level) ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आज सकाळपासून धरणातून ५०० क्युसेकने विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी तीन वाजेनंतर हा विसर्ग वाढविण्यात येणार असून ३ हजार क्युसेक इतका केला जाणार आहे…. (water discharge begins from gangapur dam)

- Advertisement -

जिल्ह्याच्या इतर भागात रिमझिम पाऊस होत आहे. इगतपुरी(Igatpuri), त्र्यंबकेश्‍वर (Trimbakeshwar), पेठ (Peth), सुरगाणा(Surgana) तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. गंगापूर (Gangapur Dam) पाठोपाठ भावली, वालदेवी धरणही तुडुंब झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.

सायंकाळी पाण्याचा विसर्ग अधिक केला जाणार असल्यामुळे नदी किनारी राहाणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे देण्यात आला आहे.

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर दोन तासांच्या अंतराने पाणी होळकर पुलाखाली येणार आहे. त्यामुळे याठिकाणी पाण्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. (Warning by disaster management department)

- Advertisment -

ताज्या बातम्या