Friday, April 26, 2024
Homeनाशिकइगतपुरी तालुक्यातील आवळखेडची दयनीय अवस्था, ना रस्ता ना पाणी !

इगतपुरी तालुक्यातील आवळखेडची दयनीय अवस्था, ना रस्ता ना पाणी !

घोटी । Ghoti

इगतपुरी तालुका म्हटला म्हणजे धरणांची खान आणि सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका म्हणून या तालुक्याची ख्याती आहे. जिल्ह्याचे काश्मीर असलेल्या या तालुक्याची पाणीटंचाई अजून काही कमी होईना तालुक्यातील आवळखेड गाव पाण्याच्या भटकंती साठी दोन दोन किलोमीटर फिरत आहे.

- Advertisement -

विशेष हे गाव इगतपुरी पासून अवघे सात किलोमीटर अंतरावर असून या गावाला ना रस्ता ना पाणी अशी गत झाली आहे. बाराशे लोकसंख्या असलेल्या या गावात सरपंच कृष्णा कैवारी व उपसरपंच संदीप पवार यांनी आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना निवेदने देऊन ही येथील समस्यां अजून सुटेना. त्यामुळे आम्ही कोणाकडे जाऊ असा प्रश्न सरपंच व उपसरपंच यांनी व्यक्त केला आहे. सरपंच म्हणतात जेवायला देऊ नका पण पाणी तर द्या अशी भावनिक मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

तालुक्यातील आवळखेड गाव हे इगतपुरी शहरापासून अगदी सात किलोमीटर अंतरावर आहे या गावात शासनाच्या वतीने एप्रिल पासून दोन टँकर सुरू आहे मात्र १२०० लोकसंख्या असलेल्या या गावाला टँकर ने तरी काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच गावात ज्या विहिरी आहे, त्या डोंगराच्या पायथ्याशी असून वयोवृद्ध, गरोदर महिला यांना पाणी आणण्यासाठी मोठ्या जिकीरीचे म्हणजे एक प्रकारचे आवाहनच समोर उभे राहते.

दरम्यान या गावाला जर तालुक्याच्या ठिकाणी यायचे असेल तर सात किलोमीटर येण्यासाठी एक तास लागतो, अशी येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या गावाला कोणी दत्तक घेत का अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

इगतपुरी शहरापासून अवघे सात किलोमीटर अंतर असलेल्या आवळखेड गावासाठी तीन विहिरी असून या पैकी दोन विहिरी कोरड्या पडत असतात व एक विहिरीला थोडक्यात पाझर असल्याने येथील लोक नंबर लावून त्या विहिरीचे पाणी भरतात.

त्याचप्रमाणे शासनाचे दोन टँकर सुरू असून ते पाणी हे पुरत नाही आणि गावाला पाण्यासाठी दुसरा पर्याय देखील उपलब्ध नाही. धरणावर एखादी योजना राबवली तर या गावाचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल असे येथील सरपंच व ग्रामस्थ यांनी सांगितले.

गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या या आदिवासी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मी सरपंच गावचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी अनेक निवेदने दिली असताना येथील प्रश्न मार्गी लागत नाही.

– सरपंच, कृष्णा कैवारी

गावाला पिण्याच्या पाण्यासाठी तर भटकंती करावी लागत आहे. मात्र इगतपुरी शहरापासून सात किलोमीटर अंतर असलेल्या या गावात रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी आम्हला एक तास लागतो. त्यामुळे तुम्हीच विचार करा हा रस्ता कसा असेल.

– संदीप पवार, उपसरपं

- Advertisment -

ताज्या बातम्या