Tuesday, April 23, 2024
Homeनगरजलसंधारण मंत्री गडाख यांनी घेतली कृषि सिंचन योजनेची आढावा बैठक; दिले 'हे'...

जलसंधारण मंत्री गडाख यांनी घेतली कृषि सिंचन योजनेची आढावा बैठक; दिले ‘हे’ निर्देश

नेवासा | तालुका प्रतिनिधी

नवीन प्रधान मंत्री कृषि सिंचन योजनेची (Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana) (2.0) आढावा बैठक मृद व जलसंधारण ना.शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली.

- Advertisement -

मुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’

प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 योजना राज्यात राबविणेबाबत कोटेकोर नियोजन करण्याचे मंत्री गडाख यांनी निर्देश दिले. सदर योजनेकरीता केंद्र व राज्य शासनाच्या निधीचे प्रमाण 60:40 आहे. मृदेची धूप कमी करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे या योजनेचे उद्दिष्ट असून सन 2022 पासून कार्यक्रम अंमलबजावणी सुरु होत आहे.

सदर कार्यक्रम महाराष्ट्रातील एकूण 30 जिल्हयांमध्ये राबविला जाणार असून मंजूर प्रकल्प संख्या 144 आहे. सदर कार्यक्रमाद्वारे एकूण 5.65 लक्ष हेक्टर क्षेत्रावर उपचार केले जाणार असून प्रकल्प मुल्य रु.1333.56 कोटी (5 वर्षासाठी) आहे.

लतादीदींच्या अंत्यदर्शनावेळी शाहरुखनं नेमकं काय केले ज्याने तो एवढा ट्रोल होतोय?, नेमकं सत्य काय?

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना पाणलोट विकास 2.0 या योजनेच्या मुलस्थानी मृद व जलसंधारणाच्या उपाय योजनांवर (उदा. उताराला आडवी पेरणी, मिश्र पिक पध्दत, मृतसरी काढणे, रुंद सरी – वरंबा पध्दतीने पेरणी, बांधबंदिस्ती, गॅबियन बंधारे इ.) उपाय योजनांवर भर देणेचे निर्देश मंत्री गडाख यांनी दिले. तसेच क्षमता उपचार नकाशाचा वापर करुन तांत्रिक दृष्टया सुयोग्य कामांची निवड करुन अंमलबजावणी करणेच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत.

Lata Mangeshkar : लता दीदींना जेवणातून दिलं गेलं विष, तीन महिने सुरु होते उपचार

जलशक्ती अभियानाशी सांगड घालून पावसाच्या पाण्याचे साठवण, पुनर्भरण, पाणी साठयांचे पुनरुज्जीवन व पुनर्वापरावर भर देण्याचे निर्देश दिले. उपलब्ध पाण्याच्या सुक्ष्म सिचंनाद्वारे कार्यक्षम वापरावर भर देऊन सिचंन क्षेत्रात वाढ होईल याबाबत विभागाने सुयोग्य नियोजन करणेबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे महिलांच्या बचत गट बळकटीस सहाय्य, लोकसहभाग व पाणलोट समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे कामकाज होणेकडे विभागाने लक्ष देण्याच्या सुचना दिल्या.

प्रकल्पाच्या गुणवत्तापूर्वक व जलद कार्यान्वयनाकरीता राज्यस्तरीय व प्रकल्प स्तरीय नोडल यंत्रणेचे बळकटीकरणाबाबत मंत्री गडाख यांनी विभागास निर्देश दिले. सदर बैठकीस जलसंधारण विभागाचे सह सचिव सु.कि.गावडे, संचालक, प्रधानमंत्री कृषि सिंचना योजना शिरोदे व इतर अधिकारी उपस्थित होते.

Lata Mangeshkar : जेव्हा बाळासाहेब लता दिदींना म्हणाले, राजकारणात येता का?

- Advertisment -

ताज्या बातम्या