अजब मागणी! एकतर नोकरी द्या, नाहीतर माझं लग्न लावा; तरुणाचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

करोनाच्या कठीण काळात अनेकांचे रोजगार गेले. ज्यांचे हातावर पोट होते त्यांनी अनेक संकटांचा सामना करावा लागला. संकटकाळात अनेकांचे रोजगार गेले, सर्व व्यवहार ठप्प झाल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान,

एका बेरोजगार तरूणाने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात तरूणाने मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी केली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. तरुणाच्या अजब मागणीवर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागले आहे.

काय म्हटलंय पत्रात?

माझं वय सध्या ३५ वर्ष झालं असून, आजपर्यंत माझं लग्न झालेलं नाही. त्याचं कारण असं की मी गेल्या ७ वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. परंतु काही ना काही कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथं मुलगी बघायला जातो, तिथं त्यांची एकच मागणी असते की मुलगा जाॅबवर पाहिजे. परंतु आपण अजून कोणत्याही प्रकारच्या नोकरीच्या जागा काढलेल्या नाहीत. त्यामुळं जॉब मिळणं कठीण आहे. करिता आपण मला एक तर जाॅब द्यावा, अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करून द्यावे ही नम्र विनंती, अशी मागणी गजानन राठोडने पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने लिहिलेली पत्र लक्षवेधी ठरली आहेत. कधी चिमुरड्यांनी आपल्या वडिलांना कुटुंबासाठी वेळ देता यावा, म्हणून घातलेली साद डोळ्यात पाणी आणतात. तर काही जणांच्या अजब मागण्या चर्चेचा विषय ठरल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *