Sunday, May 5, 2024
Homeनगरभर दुपारी चोरट्यांनी केली पावणेतीन लाखाची चोरी

भर दुपारी चोरट्यांनी केली पावणेतीन लाखाची चोरी

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

वारी कान्हेगाव ग्रामपंचायत हद्दीत दोन ठिकाणी भर दुपारी चोरट्यांनी विविध दागिने आणि रोख रकमेसह 2.75 लाखांवर हात साफ केला असल्याचा गुन्हा नवनाथ पाराजी पवार (वय 59) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. त्यामुळे शहर आणि तालुक्यातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

फिर्यादी शेतकरी नवनाथ पाराजी पवार यांनी म्हटले आहे, दि. 12 मे रोजी दुपारी 12.45 ते 1.15 वाजेच्या सुमारास आपण आपल्या शेतात असताना अज्ञात आरोपीनी आपल्या व आपले मित्र भाऊसाहेब व्यंकटराव काजळे यांच्या कान्हेगाव येथील घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कापटाचे लॉकरमध्ये असलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम त्यात 500, 200, 100 च्या नोटा अंदाजे 2 लाखांची रक्कम तर चार तोळे वजनाचे 60 हजार रुपये किमतीचे दागिने त्यात दीड तोळा वजनाचे दोन नेकलेस तसेच दोन पाने, दोन सोन्याच्या अंगठ्या, अंदाजे एक तोळा असा ऐवज लंपास केला आहे.

त्यांनी ऑफर द्यावी, आम्ही सोबत यायला तयार

याप्रकरणी फिर्यादी हे आपले शेतीचे काम आटोपून आल्यावर सदर घटना उघड झाली आहे. या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या चोरीच्या घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे आदींनी भेट दिली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.244/2023 भादंवि कलम 454, 380 अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे. कॉ. राजेंद्र म्हस्के हे करीत आहेत.

विखे-मुरकुटे-ससाणे ‘अजब’ युतीला तडायंदा शेतकर्‍यांना मिळणार 333 कडबाकुट्टी यंत्रे

- Advertisment -

ताज्या बातम्या