Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : संख्यावाढीने वॉर्ड लहान ; 133 नगरसेवक निवडून जाणार

Video : संख्यावाढीने वॉर्ड लहान ; 133 नगरसेवक निवडून जाणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शासनाने 122 वरून नगरसेवकांची Corporators संख्या वाढवून 133 केली आहे. यामुळे 11 सदस्यांची वाढ होणार आहे. मात्र यामुळे लोकसंख्या अधिक होऊन वॉर्ड Ward लहान राहणार आहे. त्याचा फायदा काही प्रमाणात निवडणूक लढणार्‍या उमेदवारांना होऊ शकतो.यंदा त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने महापालिकेची आगामी निवडणूक होणार आहे. नाशिक महापालिकेत 43 प्रभाग तीन सदस्यीय तर एक प्रभाग चार सदस्यीय राहणार आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून 29 नोव्हेंबर 2021 रोजी याबाबतचा कच्चा आराखडा महापालिका प्रशासनाने NMC Administration तयार करून निवडणूक आयोगाकडे Election Commission पाठवला आहे. नाशिक महापालिका प्रशासनाने जो कच्चा आराखडा तयार करून पाठवला आहे, त्याच बदल करण्याचा पूर्ण अधिकार आयोगाकडे आहे. यामुळे स्थानिक पातळीवर तयार झालेला आराखडा आयोगाकडे बदल होऊ शकतो. याबाबतची कार्यवाही देखील सुरू असल्याचे समजते.

सध्या राज्य अधिवेशन सुरू असून यामुळे आयोगाकडून प्रभाग रचनेचा आराखडा येण्यास उशीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन फेब्रुवारी 2022 मध्ये होणारी निवडणूक एक किंवा दोन महिने पुढे जाण्याची शक्यता दोन दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी व्यक्त केली आहे. यामुळे इच्छुकांमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून आली आहे.

दरम्यान, यंदा 122 वरून शासनाने 11 वर्ड वाढवून 133 संख्या केली आहे. यामुळे वॉर्ड छोटे तयार होणार आहे, मात्र लोकसंख्या नियमानुसार राहणार आहे. काही ठिकाणी नवीन बोर्ड तयार होणार आहे तर पूर्वीच्या सीमा व नवीन यात काही प्रमाणात बदल झाल्याची माहिती महापालिका आयुक्त जाधव यांनी दिली.

14 लाख 90 हजार लोकसंख्या

करोनामुळे 2021 मध्ये जनगणना झाली नाही. त्यामुळे महापालिकांच्या आगामी निवडणुकांकरीता प्रभागरचनेसाठी 2011च्या जनगणनेचा आधार घेतला जाणार आहे. 2011च्या जनगणनेनुसार नाशिक शहरात 14 लाख 90 हजार 53 लोकसंख्या होती. या लोकसंख्येच्या आधारेच सदस्यसंख्या व आरक्षणाची परिगणना होणार आहे.

दरम्यान प्रभागरचनेची सुरूवात उत्तर दिशेकडून करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार उत्तरेकडून ईशान्य(उत्तर-पूर्व), त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभागरचना करत शेवट दक्षिण दिशेकडे गेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या