सनपा निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर

jalgaon-digital
4 Min Read

सटाणा । प्रतिनिधी | Satana

येथील नगर परिषदेच्या (nagar parishad) आगामी निवडणुकीची (election) प्रारूप प्रभाग रचना (ward formation) प्रसिद्ध झाली असून 2011 च्या जनगणनेनुसार 37 हजार 701 लोकसंख्या 12 प्रभागात विभागण्यात आली आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार प्रभाग रचना (ward formation) जाहीर झाल्यानंतर हरकती घेण्यासाठी दि. 14 मेपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा पालिकेच्या संकेत स्थळासह वार्ता फलकावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी नितीन बागुल (Chief Officer Nitin Bagul) यांनी दिली. पालिकेचा प्रभाग रचना प्रारूप आराखडा (Ward structure draft plan) प्रसिद्ध होताच इच्छुक उमेदवारांनी प्रभाग रचना पाहण्यासाठी गर्दी केली. निवडणूक (election) एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता होती. परंतु ओबीसी आरक्षणामुळे (OBC reservation) निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.

न्यायालयाने ओबीसी आरक्षणाविना (OBC reservation) निवडणूक घेण्याचा आदेश दिल्याने निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला असून मार्च महिन्यात प्रसिद्ध केलेली प्राभग रचना जैसे थे ठेवून सुधारित कार्यक्रमानुसार प्रारुप प्रभाग रचना दि. 10 मेरोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हरकती घेण्यासाठी दि. 14 मेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. सटाणा पालिकेच्या सभागृहात 12 प्रभागातून 24 नगरसेवक (Corporator) निवडीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागात महिला लोकप्रतिनिधी असणार आहे.

राखीव अथवा सर्वसाधारण जागेवर पुरुषांबरोबर महिला देखील निवडणूक लढू शकणार आहेत. पालिकेच्या आगामी सभागृहात पुरुष नगरसेवकांबरोबरीने महिला नगरसेविकांची संख्या असू शकते किंवा त्यापेक्षा जास्त महिला नगरसेविका (Female corporator) देखील सभागृहात दिसू शकतात. ओबीसी उमेदवारांना आता खुल्या जागेवर निवडणूक लढवावी लागणार आहे.

सटाणा पालिकेच्या (Satana Municipality) लोकसंख्येनुसार निवडणूक आयोगाने (Election Commission) प्रसिद्ध केलेला प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा व त्या प्रभागाची लोकसंख्या पुढील प्रमाणे आहे. प्रभाग 1 : (2973) नर्मदापार्क, शांतीनगर, वृंदावन कॉलनी, तहसील कॉलनी, तहसील ऑफीस, सुकड नाला परिसर, इदगाह. प्रभाग 2 : (3074) सप्तपदी मंगल कार्यालय, ओम गुरूदेव कॉलनी, सन्मित्र हाऊसिंग सोसायटी, क्रांती नगर, सप्तशृंगी मंदिर परिसर. प्रभाग 3 : (3266) डिव्हाईन स्कूल, अपंग कल्याण केंद्र, टोळके वस्ती, आदिवासी बोर्डिंग, श्रीकृष्ण नगर, चौगांव बर्डी, अण्णाभाऊ साठेनगर, अजबादादा नगर. प्रभाग 4 : (3234) शामजी नगर, बसस्थानक परिसर, व्ही.पी.एन. विद्यालय परिसर, भंगार वाडा, जैन स्थानक, कृर्षी उत्पन्न बाजार समिती, पुंडलिक नगर,

कचरा डेपो परिसर. प्रभाग 5 : (3036) काळू नानाजी नगर, इंद्रप्रस्थ कॉलनी, विश्वास कॉलनी, शिवाजी नगर, आर.के. नगर, लालजी दौलत शाळा परिसर, गणपत नगर. प्रभाग 6 : (3016) मित्रनगर, पाठक मैदान, परशुराम नगर, पीडीपी नगर, शिवप्रसाद नगर, श्रमिकनगर, ठगुबाई नगर, जाधव नगर, टेलिफोन कॉलनी. प्रभाग 7 : (3189) गणेशनगर, नामपूरकर चाळ, न्यू प्लॉट, मराठी शाळा, सरकारी दवाखाना, मे. न्यायालय, दगाजी चित्रमंदिर परिसर. प्रभाग 8 : (3367) देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर परिसर, कॅप्टन अनिल पवार चौक, माहात्मा गांधी चौक, चावडी चौक, दत्तमंदिर-उपासनीरोड परिसर. प्रभाग 9 : (3317) मल्हाररोड परिसर, शिवाजीरोड परिसर,

सुभाषरोड परिसर, प्रकाश जोशी चौक, पी.डल्यू.डी. ऑफीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुल परिसर, बागलाण बेकरी परिसर. प्रभाग 10 : (3080) बाजारओटे परिसर, अहिल्यादेवी नगर, अमरधाम परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, सिध्दार्थ नगर. प्रभाग 11 : (3015) मौलाना आझाद चौक परिसर, हुतात्मा चौक परिसर, संतोषनगर, खरेवाडी, सटाणा नगर परिषद इमारत परिसर, विठ्ठल-रुख्मीणी मंदिर परिसर. प्रभाग 12 : (3160) पर्वतनगर, अंबिकानगर, पिंपळेश्वर, प्रभात मिल व बागायत परिसर. सटाणा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रस्थापित व नवोदित इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून, प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची संबंधितांना प्रतीक्षा आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *