Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाIPL 2021 वर करोनाचे सावट

IPL 2021 वर करोनाचे सावट

मुंबई | Mumbai

येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) चे १४ वे सीजन सुरु होणार आहे.

- Advertisement -

१० एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना रंगणार आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मात्र, या सामन्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. IPL 2021 च्या पहिल्या सामन्यापूर्वीच वानखेडे स्टेडियममधील ८ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील सामन्यांपूर्वी BCCI च्या चिंतेत वाढ झाली आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आगामी आयपीएल हंगामाचे १० सामने रंगणार आहेत. १० ते २५ एप्रिल दरम्यान हे सामने आयोजित करण्यात येतील. एका वृत्तसंस्थेच्या मते वानखेडे स्टेडियममधील सर्व १९ ग्राऊंडस्टाफ सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी गेल्या आठवड्यात झाली. २६ मार्च रोजी यातील ३ लोकांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर १ एप्रिल रोजी, इतर ५ लोकांना संसर्ग झाल्याचे समोर आले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील मुंबईच्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

दरम्यान, माजी भारतीय फलंदाज एस. बद्रीनाथ करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. खुद्द बद्रीनाथने रविवारी ट्विटरवरुन ही माहिती जाहीर केली. करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याने स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले आहे. बद्रीनाथपूर्वी सचिन तेंडुलकर आणि युसुफ पठाण यांनाही करोनाचा फटका बसला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या