Thursday, April 25, 2024
Homeनगरविनाकारण फिरणार्‍यांची होणार अँटीजेन चाचणी

विनाकारण फिरणार्‍यांची होणार अँटीजेन चाचणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिवसंदिवस करोनाचा संसर्ग वाढत आहे. करोनाचा हा संसर्ग अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणार्‍यांमुळे होत असल्याचा जिल्हा प्रशासनाला संशय आहे. यामुळे ग्रामीण भागात आता गर्दीच्या ठिकाणी चेक पोस्ट लावून त्या ठिकाणी विनाकारण फिरणार्‍यांना पकडून त्यांची अँटीजेन चाचण्या करण्याचे आदेश रविवारी रात्री जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

- Advertisement -

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सर्व तहसीलदार यांना आदेश काढले आहेत. यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण आणि विना परवानगी फिरणार्‍या नागरिकांमुळे करोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. यामुळे तालुका प्रशासनाने पोलीस कर्मचार्‍यांसह अत्यावश्यक मनुष्यबळासह चेक पोस्ट लावून त्या ठिकाणी विनाकारण फिरणार्‍यांची अँटीजेन चाचणी करण्याचे आदेश दिलेले आहेत.

यासाठी पोलीस विभागाच्या समन्वयाने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दोन गर्दीची ठिकाणी निश्चित करून त्या ठिकाणी विनाकारण फिरणार्‍यांची अँटीजेन चाचण्या करून त्याचा दैनदिन अहवाल करोना पोर्टलवर भरण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या