Thursday, May 2, 2024
Homeजळगावभ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अतिक्रमण विभागाला जाग

भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अतिक्रमण विभागाला जाग

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील फुले मार्केटसह (Phule markeṭ) अन्य परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण (Encroachment) वाढले आहे. अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी (Traffic jam) होत असल्याचे पहायला मिळते. मात्र, प्रशासनाकडून (administration) कुठलीही कारवाई (Any action) केली जात नाही. दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक (Shiv Sena senior corporator) नितीन लढ्ढा (Nitin Ladha) यांनी नुकत्याच झालेल्या महासभेत (General Assembly) प्रशासनाचे लक्तरं वेशिवर टांगत सर्वाधिक भ्रष्टाचार (Corruption) अतिक्रमण विभागात असल्याचा आरोप केला. या आरोपानंतर प्रशासनाला जाग आली आणि सोमवारी सकाळपासून फुले मार्केटमध्ये अतिक्रमणाची मोहीम (Encroachment campaign) राबविली. त्यामुळे फुले मार्केटने मोकळा श्वास घेतला आहे.

- Advertisement -

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फुले मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हॉकर्सचे अतिक्रमण होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. अक्षरशः पायी चालायला सुध्दा जागा नाही, इतके हॉकर्सचे अतिक्रमण फुले मार्केटमध्ये झालेले आहे.

हॉकर्सच्या अतिक्रमणामुळे मार्केटमधील व्यापारी वैतागले असून, वारंवार प्रशासनाकडे अतिक्रमण काढण्याची मागणी केली असतांनाही प्रशासन मात्र, त्यावर कुठलीही कारवाई करत नसल्याचा आरोप येथील व्यापार्‍यांनी केला आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या महासभेत ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी फुले मार्केटमधील अतिक्रमाचा मुद्दा उपस्थित करत, हॉकर्सकडून हप्ते वसूल केले जात असून, सर्वाधिक भ्रष्टाचार अतिक्रमण विभागात असल्याचा आरोप करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे प्रशासनाला जाग आल्यानंतर सोमवारी अतिक्रमण विभागाने फुले मार्केटमध्ये अतिक्रमणाची कारवाई केली.

हॉकर्स-कर्मचार्‍यांमध्ये वाद

अतिक्रमणाची कारवाई करण्यासाठी अतिक्रमहॉकर्स-कर्मचार्‍यांमध्ये वाद

अतिक्रमणाची कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाचे प्रमुख संजय ठाकूर, सतीष ठाकरे, संजय पाटील, नाना कोळी, साजीद अली, नितील भालेराव, सलमान भिस्ती, शेखर ठाकूर, भानुदास ठाकरे, किशोर सोनवणे यांच्यासह पथक फुले मार्केटमध्ये सकाळी 10 वाजता गेले होते. पथक दाखल होताच हॉकर्सची पळापळ सुरु झाली. त्यानंतर साहित्य जप्त करत, असतांना काही हॉकर्स आणि कर्मचार्‍यांमध्ये वाद देखील झाला होता.

अतिक्रमण काढल्याने फुले मार्केटने मोकळा श्वास घेतला.

दरम्यान, कर्मचारी सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी ठाण मांडून होते. काढल्याने फुले मार्केटने मोकळा श्वास घेतला. दरम्यान, कर्मचारी सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी ठाण मांडून होते. विभागाचे प्रमुख संजय ठाकूर, सतीष ठाकरे, संजय पाटील, नाना कोळी, साजीद अली, नितील भालेराव, सलमान भिस्ती, शेखर ठाकूर, भानुदास ठाकरे, किशोर सोनवणे यांच्यासह पथक फुले मार्केटमध्ये सकाळी 10 वाजता गेले होते. पथक दाखल होताच हॉकर्सची पळापळ सुरु झाली. त्यानंतर साहित्य जप्त करत, असतांना काही हॉकर्स आणि कर्मचार्‍यांमध्ये वाद देखील झाला होता. अतिक्रम काढल्याने फुले मार्केटने मोकळा श्वास घेतला. दरम्यान, कर्मचारी सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी ठाण मांडून होते.

हॉकर्सचे साहित्य जप्त

फुले मार्केटमध्ये जवळपास 300 ते 325 पेक्षा अधिक हॉकर्स आपल्या व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली. सद्या पावसाळा सुरु असल्यामुळे हॉकर्सने पावसाच्या बचावासाठी प्लास्टीकचे फट बांधले होते. सोमवारी ते अतिक्रमण विभागाने काढून जप्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या