Wednesday, May 8, 2024
Homeनगरवाकडी-श्रीरामपूर रस्त्यासाठी 4 कोटी 43 लाख रुपये निधी मंजूर

वाकडी-श्रीरामपूर रस्त्यासाठी 4 कोटी 43 लाख रुपये निधी मंजूर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

वाकडी श्रीरामपूर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली असताना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करत वाकडी-श्रीरामपूर रस्त्यासाठी राहाता तालुका हद्द असलेल्या धनगरवाडी फाटापर्यंत पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून 4 कोटी 43 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेऊन त्यास प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी गावातून श्रीरामपूर-राहाता, शिर्डीकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता कित्येक वर्षापासून अत्यंत खराब असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने काही भागातून दुचाकीसह चारचाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे. नुकतेच सरपंच डॉ. संपतराव शेळके व गणेश कारखान्याचे संचालक अ‍ॅड. भाऊसाहेब शेळके यांच्या आग्रही मागणीतून खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नाने वाकडी गाव ते गोदावरी कालवा दरम्यान मोठ मोठे खड्डे रस्ता दुरुस्तीचे काम झाले.

गणेशनगर ते वाकडी गाव दरम्यान रस्ता मजबुतीकरणासाठी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील 50 लाख रुपये निधी दिला होता. वाकडी श्रीरामपूर रस्त्याची अजूनही फार बिकट परिस्थिती असताना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाकडी-श्रीरामपूर रस्त्यासाठी राहाता तालुका हद्द असलेल्या धनगरवाडी फाटापर्यंत पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून 4 कोटी 43 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेऊन त्यास प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे.

वाकडी ते दत्तनगर फाटा हा रस्ता अत्यंत दुरवस्था झालेल्या अवस्थेत आहे. वाकडी मार्गे शिर्डी शिंगणापूर ये-जा करणारे प्रवासी भाविकांची संख्या वाढत आहे. हा महत्त्वाचा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून दत्तनगर येथील अशोक लोंढे, वाकडी येथील रूपेंद्र काले यांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केले आहे. राजेंद्र लहारे, जिल्हा परिषद सदस्या कविता लहारे, पंचायत समिती सदस्य अर्चनाताई आहेर यांनी वाकडी-श्रीरामपूर रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली होती.

या रस्त्याची कितपत आवश्यकता आहे यासाठी वाहतूक प्रमाण व दैनंदिन दळणवळण साधने याचा वाकडी येथील प्रगत सोसायटी लगत कॅमेरे बसवून एक दिवस सर्वे करण्यात आला होता त्यावेळी संदीप लहारे यांनी प्रयत्न केले होते. कैलास लहारे यांनी वृत्तपत्राचे कात्रण व निकृष्ट रस्त्याचे फोटो संबंधित अधिकारी व मंत्रालय मुंबई येथील संबंधित विभागाला ईमेल केले होते.

त्याचप्रमाणे वाकडीचे सरपंच डॉ. संपतराव शेळके, गणेश कारखान्याचे संचालक अ‍ॅड. भाऊसाहेब शेळके व खा. डॉ. सुजयदादा युवा मंचचे अध्यक्ष संदिपानंद लहारे यासह काही सुज्ञ नागरिकांनी देखील ना. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील व शालिनीताई विखे पाटील यांच्याकडे हा रस्ता दुरुस्तीसाठी निधी मिळावा म्हणून आग्रह धरला होता. त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांनी देखील निकृष्ट दर्जाचा रस्ता व मोठमोठे खड्डे व रस्त्याची आवश्यकता यांचे वेळोवेळी विश्लेषण करून वृत्त प्रसारित केले होते.

वाकडी ते दत्तनगर फाटा दरम्यान रस्ता दुरुस्त झाल्यास शिर्डी शिंगणापूर ये जा करणारे प्रवाशी भक्त व वाकडी येथिल खंडोबा मंदिरात दर्शनास येणार्‍या भाविकांमध्ये वाढ होऊन हा रस्ता झाल्यास दळण वळण व विकास कामास आणखी मदत होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या