Saturday, April 27, 2024
Homeजळगावरब्बीच्या पेरणीसाठी वाघूरचे पाणी मिळावे

रब्बीच्या पेरणीसाठी वाघूरचे पाणी मिळावे

जळगाव – Jalgaon

यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला, मात्र तरी सुध्दा बळीराजाचे संकट सुटता सुटेना. धो-धो बरसणाऱ्या पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस न झाल्याने …

- Advertisement -

जमीनीत रब्बी हंगामास आवश्यक असा ओलावा नसल्याने पेरणीसाठी वाघुर धरणाचे पाणी मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी याबाबत वाघुर धरण विभागास निवेदन दिले आहे.

यंदा वाघुर धरणात १०० टक्के जलसाठा असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी वाघुर धरण कार्यक्षेत्रातील उजव्या व डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा रब्बी हंगामासाठी फायदा होईल अशी मागणी जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी केली आहे. जमीनीतील ओलावा निघून गेल्याने रब्बीची झालेली पेरणी वाया गेली. वाघुरचे पाणी वेळेवर मिळाले तर त्याचा फायदा रब्बीसाठी होईल अशी अपेक्षा असंख्य शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या