वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी बेलापूर ग्रामपंचायत कामगारांचे धरणे आंदोलन

jalgaon-digital
2 Min Read

बेलापूर |वार्ताहर| Belapur

तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या नेतृत्वाखाली कर्मचार्‍यांनी ग्रामपंचायतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी कॉ. बाळासाहेब सुरूडे, कॉ. राजेंद्र बावके, कॉ. जीवन सुरूडे, कॉ. श्रीकृष्ण बडाख आदी उपस्थित होते.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात युनियनचे सरचिटणीस कॉ. जीवन सुरूडे यांनी म्हटले आहे की, मागील आंदोलनात दिलेल्या लेखी आश्वासनानुसार ग्रामपंचायत कामगारांना शासनाने निर्धारित केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी करावी, वेतन 10 तारखेच्या आत जमा करावे, थकीत फंडाचे हफ्ते तातडीने भरणे, ग्रामपंचायतीतील सर्व कामगारांचे भविष्य निर्वाह निधी, नाशिक येथे खाते उघडणे यासह विविध मागण्यांची तातडीने सोडवणूक करावी. याकरिता ग्रामपंचायतील सर्व विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेे आहेत.

सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे आदींनी प्रश्नाबाबत संघटनेशी चर्चा केली. परंतु समाधानकारक तोडगा न निघाल्याने युनियनने आंदोलन सुरूच ठेवत तातडीने सर्व मागण्या न सोडविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

आंदोलनात रवींद्र मेहेत्रे, रमेश लगे, अनिल गाढे, बाळासाहेब तागड, बाबासाहेब लोंढे, असिफ ठाकूर, किरण खरोटे, म्हाळू खोसे, राजेंद्र भिंगारदिवे, दत्तात्रय वक्ते, बाबासाहेब प्रधान, योगेश अमोलिक, अविनाश शेलार, अविनाश तेलोरे, शाम भिंगारदिवे, अशोक राऊत, गणेश नवले, विजय खरोटे, सचिन नगरकर, अमोल साळवे, सचिन साळुंके, रवी बागडे, संकेत मोडके, सागर भिंगारदिवे, सुशीला खरात, निर्मला भिंगारदिवे, कलाबाई शेलार, निर्मला गाढे, निर्मला तेलोरे, सगुणा तांबे, सरस्वती बागडे, मनोज खर्डे आदींसह कामगार सहभागी झाले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *