Friday, April 26, 2024
Homeनगरवाडिया पार्क मैदानात टर्फ विकेट बनविणार : आ. जगताप

वाडिया पार्क मैदानात टर्फ विकेट बनविणार : आ. जगताप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यस्तरीय आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले. आमदार चषक स्पर्धा ही तरुणांना प्रोत्साहन देणारी व नवीन पिढीला प्रेरणा देणारी स्पर्धा आहे. वडियापार्क येथे लवकरच शासकीय नियमांची पूर्तता करून टर्फ व्हीकेटचे मैदान उभारू व खेळाडूंना सर्व सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

दरम्यान, राज्यस्तरीय क्रिकेट 20-20 आमदार चषक स्पर्धेचा मानकरी हुंडेकरी ट्रान्सपोर्ट ठरला. हुंडेकरी ट्रान्सपोर्ट विरुद्ध पुनीत बालन या संघात झालेल्या अटीतटीच्या स्पर्धेमध्ये हुंडेकरी ट्रान्सपोर्ट संघाने दणदणीत विजय मिळवित आमदार चषक स्पर्धेत आपल्या संघाचे नाव कोरले तर उपविजेता संघ पुणे येथील पुनीत बालन व तृतीय क्रमांक हुंडेकरी मोटर्सने मिळवला. यावेळी पारितोषिक वितरीत करताना अरुण जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रा. माणिकराव विधाते, सचिव गणेश गोंडाळ, महावीर ग्रुपचे संचालक राजेश भंडारी, सुमतीलाल कोठारी, नगरसेवक प्रकाश भागनगरे, नगरसेवक विपुल शेटीया, संजय चोपडा, अर्बन सेलचे अध्यक्ष प्रा.अरविंद शिंदे, क्रिकेटर अनुपम संकलेचा, वसीम हुंडेकरी, उद्धव शिंदे, विनीत म्हस्के, रोहित जैन, अजय कवीटकर, संजय वालेकर, संदीप आडोळे, महेश गोंडाळ, अतुल पलघडमल, संदीप घोडके, सागर घोडके, सुभाष येवले, सुरेश बनसोडे तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा. विधाते यांनी तर सूत्रसंचालन सुभाष येवले यांनी मानले तर आभार गणेश गोंडाळ यांनी मानले.

अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दिव्यांग हिंगणेकर यांनी पटकावला. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज यश जाधव तर उत्कृष्ट गोलंदाज हेरंब परब, मॅन ऑफ द सिरीज नवशाद शेख यांनी मिळवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या