Tuesday, April 23, 2024
Homeधुळेवाडी शेवाडी उजवा कालव्याच्या 900 मीटर कामास प्रारंभ

वाडी शेवाडी उजवा कालव्याच्या 900 मीटर कामास प्रारंभ

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

सत्ता असो अथवा विरोधात पण शेतकर्‍यांच्या हितासाठी नेहमीच संघर्ष करीत आलो. शेतकरी सुखी करायचा असेल तर शेतीच्या सिंचनाची कामे करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

त्यामुळे सिंचनाच्या कामांना प्राधान्य देत सरकारशी लढा देत असतो. त्यामुळे धुळे तालुक्यातील रामी शिवारातील प्रलंबित मुख्य उजवा कालव्याच्या कामास प्रारंभ झाल्यामुळे धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील शेतकर्‍यांना फायदा होणार असल्याची माहिती आ.कुणाल पाटील यांनी दिली.

वाडी शेवाडी उजवा मुख्य कालव्यात शेती जाणार्‍या रामी ता.धुळे येथील प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना कोरवाडवाहू क्षेत्राचा मोबदला शासनामार्फत मंजुर करण्यात आला होता. मात्र सदर प्रकल्पबाधीत शेती ही बागायत असल्याने रामी शिवारातील शेतकर्‍यांची बागयती क्षेत्रानुसार वाढीव मोबदला मिळावा अशी मागणी होती.

त्यामुळे या शिवारातील 900 मीटर लांबीचे काम प्रलंबित होते. सदर काम सुरु होवून धुळे व शिंदखेडा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी मिळाले पाहिजे यासाठी आ.कुणाल पाटील यांनी शेतकरी व सिंचन विभागाच्या अधिकार्‍यांमध्ये समन्वय घडवून आणला. प्रकल्पबाधित शेतकर्‍यांचे समाधान करुन सदर काम सुरु करण्यास शेतकरी तयार झाले. त्यानुसार नुकतेच आ. कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत रामी शिवारातील 900 मीटर प्रलंबित कामाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी आ.कुणाल पाटील म्हणाले की, शेतकर्यांचे सिंचनाचे प्रश्न सोडवून शेती बागयती झाली तर शेतकरी समृध्द होवू शकतो, त्यामुळे धुळे तालुक्यात नेहमीच सिंचनाच्या कामांना प्राधान्य देवून त्यासाठी निधी मंजुर करुन आणतो.त्यासाठी अनेकवेळा सरकारशी भांडावेही लागते. मात्र शेतकर्‍यांच्या हितासाठी माझी नेहमीच संघर्षाची तयारी असते असे आ.पाटील यांनी सांगितले.

यावेळी वाडी शेवाडी प्रकल्प जलसंपदा विभागाचे अधिकारी तसेच लामकानी सरपंच धनराज पाटील, माजी पं.स.सदस्य परशुराम देवरे, रामी ज्येष्ठ नेते उपसरपंच दिलीप गिरासे, माजी सरपंच रोहिदास माळी, बुरझड माजी उपसरपंच एन.डी.पाटील, सरपंच सौ.मनिषा महाले, योगेश माळी, सरपंच संतोष पाटील, निंबा माळी, चंद्रकांत माळी,सुनंदा भिल आदी उपस्थित होते.

18 कि.मी.पर्यंत पाणी

रामी ता.धुळे शिवारातील 900 मीटरचे लांबीचे काम सुरु व्हावे म्हणून आ.कुणाल पाटील यांनी शेतकरी आणि जलसंपदा विभाग यांचा समन्वय साधून शेतकर्‍यांच्या प्रश्न सोडविल्यामुळे प्रलंबित कामाचा अडथळा दूर झाला. वाडी शेवाडी मुख्य उजवा कालव्याची एकूण लांबी 18 कि.मी. असून या कालव्यावरील प्रलंबित 900 मी.चे काम सुरु झाल्यामुळे धुळे तालुक्यातील लामकानी, रामी, बोरीस, वडणे,बुरझड आणि शिंदखेडा तालुक्यातील तामथरे, चिमठावळ, सवाई मुकटी आदी गावातील शेतकर्‍यांच्या शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या