Friday, April 26, 2024
Homeनगरवडगाव गुप्ता हनीट्रॅप: तरूणीचा आणखी एक पंटर जेरबंद

वडगाव गुप्ता हनीट्रॅप: तरूणीचा आणखी एक पंटर जेरबंद

अहमदनगर|Ahmedagar

पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील बागायतदाराला हनीट्रॅपच्या (Honeytrap) जाळ्यात अडकविणार्‍या टोळीमधील तरूणीच्या आणखी एका पंटरला (Punter) एमआयडीसी पोलिसांनी अटक (MIDC Police Arrested) केली आहे. अर्जुन नारायण वायभासे (वय 24 रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) असे अटक (Arrested) केलेल्या पंटरचे नाव आहे. त्याला न्यायालयाने 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत (Court Police cell order) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान सदर तरूणीने आपला पती म्हणून पंटर वायभासे याला उभे केले असल्याची माहिती, तपासी अधिकारी सहायक निरीक्षक युवराज आठरे (Assistant Inspector Yuvraj Athare) यांनी दिली.

- Advertisement -

वडगाव गुप्ता (Wadgaon Gupta) परिसरात राहणार्‍या तरूणीने पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील बागायतदाराशी मैत्री केली. त्या बागायतदाराला वडगाव गुप्ता (Wadgaon Gupta) येथील घरी बोलून घेतले. तेथे त्याच्यासोबत फोटो काढले. या फोटोच्या आधारे तरूणीने त्या बागायतदाराला ब्लॅकमेल (Blackmail) करण्याचे ठरविले. 15 जून रोजी सायंकाळी ते दोघे एकत्र असताना त्याठिकाणी अर्जुन वायभासे आला. त्याने त्यांना एकत्र पाहिले. मी या महिलेचा पती आहे, असे वायभासे याने बागायतदाराला भासविले व त्याला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केली.

खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बागायतदाराकडील पाच हजार रूपयांची रक्कम काढून घेतली होती. नंतर पंटर गणेश गिर्‍हे याच्या मध्यस्थीने बागयतदाराकडून दोन लाख रूपयाचे तीन चेक घेतले होते. दरम्यान या हनीट्रॅप टोळीने आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधावा व फिर्याद द्यावी, असे आवाहन निरीक्षक आठरे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या