Thursday, April 25, 2024
Homeनगरवडाळा महादेवला विकासकामासाठी भरघोस निधी उपलब्ध करणार - आदिक

वडाळा महादेवला विकासकामासाठी भरघोस निधी उपलब्ध करणार – आदिक

वडाळा महादेव |वार्ताहर|Wadala Mahadev

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील वाडी, वस्ती, गावठाण परीसराच्या विकास कामासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अविनाश आदिक यांनी दिले.

- Advertisement -

अविनाश आदिक यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्यानंतर प्रथमच ते वडाळा महादेव योथ आले होते. यावेळी त्याननी जागृत देवस्थान महादेव मंदिर या ठिकाणी भेट देत सरपंच, ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देवस्थानचे दर्शन घेतले.

यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तमराव पवार, सी. वाय. पवार, राजेंद्र पवार, कैलास पवार, चंद्रकांत पवार, रमेश पवार, भैय्यासाहेब पवार, उद्धवराव पवार, अशोक होळकर, रफिक शेख, संजय दळवी, तान्हाजी कसार, जयसिंग पवार, आप्पासाहेब वाघ, प्रकाश गोसावी, बाबासाहेब राऊत, शरद पवार, अविनाश पवार, विश्वास राव पवार, भरत पवार, अशोक पवार, दादा पाटील, कैलास कसार, सचिन पवार, विजय राउत, विजय उघडे आदी ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते. सरपंच कृष्णा पवार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या