व्हीटीएम कीट खरेदीत गफला ?

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रूग्णालयाकडून (District Hospital) व्ही.टी.एम.किटची (V.T.M. Kit) चढ्या दराने आणि टेंडर (Tender) न काढताच खरेदी करण्यात आल्याची तक्रार (Complaint) विभागीय आयुक्तांकडे (Divisional Commissioners) करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयाने 1 मार्च 2020 पासून किती व्ही.टी.एम. किट (V.T.M Kit) खरेदी केले, याची माहिती अधिकारांतर्गत सामाजिक कार्यकर्ते अमोल कोठारी (Amol Kothari) यांनी माहिती मागितली होती. 2 महिने उलटून गेल्यानंतरही ही माहिती त्यांना मिळालेली नाही. याबाबत त्यांनी निवेदन देऊन नाशिक मंडळ आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. राधाकृष्ण गमे (Nashik Board Deputy Director of Health Services Dr. Radhakrishna Game) यांचे लक्ष वेधले.

जिल्हा रुग्णालयाने 1 मार्च 2020 पासून किती व्ही.टी.एम.किट (V.T.M. Kit) खरेदी केल्या, त्या कोणत्या एजन्सीकडून व काय दराने खरेदी केल्या. त्यासाठी ई-टेंडर (E-Tender) पद्धतीचा अवलंब केला का, या माहितीसाठी 9 जून 2021 रोजी अर्ज केला.

अपिलात माहिती पुन्हा मागितल्यानंतर संशयास्पद माहिती मिळाली. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा (Hint) कोठारी (Amol Kothari) यांनी दिला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *